Join us
Daily Top 2Weekly Top 5

कथा सुचली लालबागमध्येच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 16:54 IST

लालबागची राणी या चित्रपटाची कथा ही लालबागमध्ये राहाणाऱ्या  एका मुलीच्या अवतीभवती फिरते. या चित्रपटाची कथा ही लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्यावेळीच ...

लालबागची राणी या चित्रपटाची कथा ही लालबागमध्ये राहाणाऱ्या  एका मुलीच्या अवतीभवती फिरते. या चित्रपटाची कथा ही लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्यावेळीच सुचली असे या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितले.लक्ष्मण हे लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्यावेळी डॉन या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. त्यावेळी एक लहान मुलगी हरवली असल्याने तिचे आईवडील प्रचंड अस्वस्थ झाले होते. ते तिला वेड्यासारखे शोधत होते. आमच्या मुलीच्या हाताच खूप फुगे आहेत अशी मुलगी दिसली तर आम्हाला सांगा असे ते सगळ्यांना सांगत होते.त्यांची ती अवस्था पाहून या कथानकाचा धागा पकडून चित्रपट करावा अशी त्यांची तेव्हापासूनची इच्छा असल्याचे उतेकर यांनी सांगितले. चित्रपटाची कथा डोक्यात दहा वर्षांपासून होती. पण चित्रपट बनवायला वेळ लागला असे त्यांनी सांगितले.