Join us

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अजय-अतुल अभिमानाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 12:40 IST

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातील संगीताचं रेकॉर्डिंग अजय-अतुल यांनी थेट अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे केले आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर ...

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातील संगीताचं रेकॉर्डिंग अजय-अतुल यांनी थेट अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे केले आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर या जोडीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या मराठमोळी जोडीने थेट हॉलीवुडमध्ये जाऊन संगीताचं रेकॉडिंग करणे ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमान वाटेल अशीच ही गोष्ट आहे. या जोडीच्या या रेकॉर्डबद्दल दिग्दर्शक रवी जाधव यांनी भरभरून कौतुक केले आहे. ते म्हणाले, अजय-अतुल... केवळ तुमच्या साठीच नाही तर संपुर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. स्वप्न सर्वच पाहतात पण ती प्रत्यक्ष सत्यात उतरून साध्य करणे खुप कमी लोकांना जमते. तुम्हाला ते झिंगाट जमलंय!!! खुप खुप शुभेच्छा बंधुंनो!!!निखिल साने व नागराज मंजुळे तुमचेही आभार ह्या आमच्या मित्रांना पुर्ण ताकदीने पाठिंबा दिल्याबद्दल .. खरंच या जोडीला लोकमत सीएनएक्सच्या देखील शुभेच्छा.