Join us
Daily Top 2Weekly Top 5

फिट राहा, तंदुरुस्त राहा… प्रिया बापटचा २०१९साठी संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 08:00 IST

प्रत्येकाचा नवीन वर्षाचा काही ना काही संकल्प असतो. असाच काहीसा संकल्प मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिने केला आहे.

२०१८ या वर्षाला बाय बाय करत साऱ्यांनीच मोठ्या आनंदाने आणि उत्साहात नववर्षाचे स्वागत केले आहे. गेल्या वर्षात झालेल्या चुका टाळत नवे वर्ष अधिक चांगलं कसं जाईल याचे संकल्प प्रत्येकाने केले आहे. प्रत्येकाचा नवीन वर्षाचा काही ना काही संकल्प असतो. असाच काहीसा संकल्प मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिने केला आहे. आगामी वर्षात अधिकाधिक फिट आणि तंदुरुस्त राहण्याचा संकल्प तिने केला आहे. सोशल मीडियावर तिने जिममधील एक फोटो शेअर केला आहे. “या वर्षात अधिकाधिक फिट राहायचं. डेंग्यूमुळे काम चुकता कामा नये आणि त्याचा पश्चातापही होणार नाही यासाठी तंदुरुस्त राहायचं” असं कॅप्शन तिने या फोटोला दिला आहे. नववर्षात फिट रहा, तंदुरुस्त राहा असाच संकल्प तिने सोडला आहे.

सप्टेंबर २०१८ मध्ये प्रियाला डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे तिला काम अर्धवट सोडावं लागलं होतं. हे पुन्हा होऊ नये यासाठी प्रियाने हा संकल्प केला आहे. मराठीसह हिंदी सिनेमा, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या प्रियाने अभिनयाची छाप पाडली आहे. आपल्या अभिनयाने तिने तिन्ही माध्यमं गाजवली असून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. मराठीसह हिंदी सिनेमात प्रियाने विविध दर्जेदार आणि आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत.  

 

लवकरच प्रिया पती उमेश कामतसह रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. प्रिया सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह आहे. खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. आपल्या फॅन्ससह संवाद साधता साधता ती त्यांच्यासह फोटो, आगामी सिनेमाचे अपडेट्सही देत असते.

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत