Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्पृहा जोशीच्या या साडीची का होतेय सोशल मीडियावर चर्चा, काय आहे यात खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 10:16 IST

स्पृहा जोशीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून या फोटोत तिने रंगीबेरंगी साडी नेसली असून त्यावर तिने काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे.

ठळक मुद्देया साडीवर आपल्याला काही लोकांचे चेहरे पाहायला मिळत आहेत. ही साडी खूप युनिक असून या साडीमुळे तुझे सौंदर्य आणखी खुलून आले आहे असे स्पृहाचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. 'मोरया', 'पैसा पैसा' यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. काहीच महिन्यांपूर्वी तिचा 'बाबा' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. याशिवाय छोट्या पडद्यावरही मालिकांमधून तिने तिच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते. तिचे फोटो तिच्या फॅन्सना प्रचंड आवडतात.

स्पृहा जोशीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून या फोटोत तिने रंगीबेरंगी साडी नेसली असून त्यावर तिने काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. या फोटोची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या लूकमध्ये ती खूपच छान दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. पण त्याचसोबत तिची ही साडी देखील प्रेक्षकांना भावत आहे. कारण या साडीवर आपल्याला काही लोकांचे चेहरे पाहायला मिळत आहेत. ही साडी खूप युनिक असून या साडीमुळे तुझे सौंदर्य आणखी खुलून आले आहे असे स्पृहाचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

स्पृहाचा ‘विक्की वेलिंगकर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात सोनाली कुलकर्णी देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये  सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी दिसत असून तिचा वेगळा लूक पाहायला मिळाला होता. ‘विक्की वेलिंगकर’ हा मराठी चित्रपट ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित होणार असून या चित्रपटात स्पृहाचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

स्पृहा जोशी सध्या कलर्स मराठीवर सूर नवा ध्यास नवा – स्वप्न सूरांचे, स्वप्न सार्‍यांचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून तिचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना चांगलेच भावत आहे. याआधीच्या सिझनमध्ये देखील तिने सूत्रसंचालकाची भूमिका बजावली होती. 

टॅग्स :स्पृहा जोशी