Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बाबा, तू होऊ शकतो सुपरहीरो?", 'शक्तिमान' सिनेमातून आदिनाथ कोठारे-स्पृहा जोशी प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 17:33 IST

'शक्तिमान' सिनेमात स्पृहाबरोबर अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

अलिकडेच लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशीची नवी मालिका सुरू झाली आहे. त्यानंतर आता स्पृहाने आणखी एक गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. आता स्पृहा नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर स्पृहाच्या नव्या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'शक्तिमान' असं स्पृहाच्या नव्या सिनेमाचं नाव असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'शक्तिमान' सिनेमात स्पृहाबरोबर अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरवर स्पृहा आणि आदिनाथबरोबर एक लहान मुलगा दिसत आहे. 'शक्तिमान' सिनेमाच्या पोस्टरवर आदिनाथच्या खांद्यावर छोटा मुलगा दिसत असून त्याला सुपरमॅनसारखे पंख लावल्याचं दिसत आहे. "बाबा, तू होऊ शकतो सुपरहीरो?" असं पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. या सिनेमातून बापलेकाच्या नात्याची हळवी गोष्ट पाहायला मिळणार आहे. 

स्पृहा आणि आदिनाथबरोबरच 'शक्तिमान' सिनेमात प्रियदर्शन जाधव, विक्रम गायकवाड, ईशान कुंटे हे कलाकार दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केलं आहे. २४ मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :स्पृहा जोशीआदिनाथ कोठारेमराठी चित्रपट