स्पृहा जोशीचा नवरा वरद लघाटे होता पत्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 12:36 IST
स्पृहाने गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्पृहाने आज एक अभिनेत्री, गीतकार म्हणून ...
स्पृहा जोशीचा नवरा वरद लघाटे होता पत्रकार
स्पृहाने गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्पृहाने आज एक अभिनेत्री, गीतकार म्हणून स्वतःचे नाव कमावले आहे. तिने दे धमाल या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, उंच माझा झोका यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली. या सगळ्याच मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. या मालिकेतील तिच्या भूमिकांची नाव देखील आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहेत. तसेच समुद्र, डोण्ट वरी बी हॅपी यांसारख्या नाटकातून तिने तिची अभिनयक्षमता दाखवून दिली. पैसा पैसा, मोरया, जाऊ द्या ना बाळासाहेब, बायोस्कोप, अ पेइंग गेस्ट यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. मराठी चित्रपटात आपली एक ओळख बनवल्यानंतर स्पृहा दाक्षिणात्य सिनेमांमध्ये देखील आपले भाग्य आजमावणार आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी तिच्या फॅन्सना दिली होती. स्पृहाचा नुकताच २७ वा वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचे तिचा नवरा वरद लघाटेसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट केले असून अनेकांनी हा फोटो लाइक केला आहे. स्पृहा आज तिच्या कामात प्रचंड व्यग्र असते. पण तरीही ती तिच्या कुटुंबाला वेळ देते. तिचे लग्न २०१३ मध्ये वरद लघाटे सोबत झाले. स्पृहा आणि वरद यांनी पाच वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. २००८ पासून हे दोघे नात्यात होते आणि अखेर २४ फेब्रुवारी २०१३ ला हे दोघे विवाहबंधनात अडकले. वरदचा मराठी चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही. तुम्हाला माहीत आहे का वरदने त्याची कारकीर्द एक पत्रकार म्हणून सुरू केली. तो मराठीतीत एका नामांकित वर्तमानपत्रामध्ये लेख लिहित असे. पण आता पत्रकारितेचे क्षेत्र सोडून वरद मार्केटिंग प्रोफेशनकडे वळला आहे. स्पृहाच्या करीअरमध्ये तो कधीही ढवळाढवळ करत नाही. तो नेहमीच तिच्या पाठिशी उभा राहातो. Also Read : पाहा.... स्पृहा जोशीची हॅपी फॅमिली