Join us
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांसाठी खास गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 18:28 IST

प्रियांका लोंढे                               मराठी चित्रपटसृष्टीची ...

प्रियांका लोंढे
                    
           मराठी चित्रपटसृष्टीची उदयोन्मुख गायिका म्हणून प्रियांका बर्वेकडे पाहिले जाते. वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायल्यानंतर ‘बस स्टॉप’ या चित्रपटासाठी प्रियांका एक गाणे गात आहे. या गाण्याविषयी सीएनएक्सशी बोलताना प्रियांका सांगते, "मी आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत. परंतु हे गाणे खूपच वेगळे आहे. मला बस स्टॉप या चित्रपटाच्या निमित्ताने मुव्ह ऑन... मुव्ह ऑन हे एनर्जेटिक गाणे गायला मिळाले आहे. बस स्टॉप हा चित्रपट तरुणांसाठी आहे. त्यामुळे हे गाणेदेखील तरुणांना विचारात घेऊन बनवण्यात आले आहे. हे गाणे रेकॉर्ड करताना रोहित राऊत आणि मी खूपच धमाल केली. आजच्या तरुण पिढीला भावणारे हे गाणे आहे. हे गाणे खूप लाऊड असल्याने मी हे गाणे चांगल्याप्रकारे गाऊ शकेन का असा मला प्रश्न पडला होता. परंतु ऋषिकेश, सौरभ आणि जसराज या तिघांनी हे गाणे माझ्याकडून खूप छानप्रकारे गाऊन घेतले. रसिकांना हे माझे नव्या अंदाजातील गाणे नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. हे गाणे वैभव जोशी यांनी लिहिले असून ऋषीकेश, सौरभ आणि जसराज यांनी संगीत दिले आहे.