Join us  

दक्षिणेतही मराठी सिनेमाचा डंका, हैदराबादेत नाळ अन् डॉ. घाणेकर सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 3:27 PM

सिनेमागृहात मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शो मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांकडे धाव घ्यावी लागायची.

मुंबई : सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा नाळ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर आणि डॉ. काशीनाथ घाणेकर या चित्रपटालाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच मुंबईतल्या सिनेमागृहात मराठी सिनेमांनी हिंदीला टाकलं मागे टाकल्याचे चित्र सध्या दिसले. तर, आता हैदराबादमध्येही आणि डॉ. काशिनाथ घाणेकरनाळ चित्रपटाला स्क्रीन मिळाले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटांचा झेंडा अटकेपार गेला आहे. 

मुंबईतल्या सिनेमागृहात मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शो मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांकडे धाव घ्यावी लागायची. हे चित्र होते काही वर्षांपूर्वीचं. मात्र, 'सैराट'च्या घवघवीत यशानंतर आणि चित्रपटांचा सुधारलेला दर्जा यामुळे सिनेमागृहात मराठी चित्रपटांना मानाचे स्थान मिळू लागले आहे. नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' आणि 'नाळ' या दोन चित्रपटांनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. त्यामुळे मोठे स्टार असलेल्या बॉलिवूड चित्रपटांना चांगलाच फटका बसला आहे. आता, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही मराठी सिनेमांचा डंका वाजला आहे. 

हैदराबादच्या पंजागुट्टा येथील पीव्हीआर मल्टीप्लेक्समध्ये 7.30 वाजता या चित्रपटांना स्क्रीन मिळाली आहे. तर सुजाना मॉल येथील पीव्हीआर मल्टीप्लेक्समध्ये रात्री 10.30 वाजताची स्क्रीन मिळाली आहे. तसेच काचीगुडा येथील आयनॉक्स मल्टीप्लेक्सध्येही 7.10 वाजता या प्राईम टाईमचे स्क्रीन मिळाले आहेत. विशेष म्हणजे हैदराबादमध्ये या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद पाहून बुधवार 21 नोव्हेंबरपर्यंत हे दोन्ही चित्रपटाचे स्क्रीनवर झळकणार आहेत.  दरम्यान, दिवाळीत बॉलिवूड चित्रपटांचा सुळसुळाट सुरू असतो. यंदाच्या दिवाळीत अमिताभ बच्चन आणि आमीर खान अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' प्रदर्शित झाला. त्याला टक्कर देण्याचे धाडस 'डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाने दाखवले. या लढाईत 'डॉ. काशिनाथ घाणेकर' ने बाजी मारली. तर, नाळ प्रदर्शित होताच, या दोन चित्रपटांनी हैदराबादेतही प्रेक्षकांवर छाप पाडली.  

टॅग्स :नाळकाशिनाथ घाणेकर