Join us

मृणालवर चढली सुमन कल्याणपुरकर यांच्या आवाजाची जादु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 18:41 IST

                 मृणाल कुलकर्णींनी आजपर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन ...

                 मृणाल कुलकर्णींनी आजपर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अवंतिका, सोनपरी या त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. अभिनेत्री म्हणून नेहमीच वेगळ््या धाटणीच्या भूमिका करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.  नूकताच त्यांनी टष्ट्वीटरवर सुमन कल्याणपुरकर यांच्यासोबतचा एक फोटो अपलोड केला आहे. हा फोटो अपलोड करण्यामागे देखील एक विषेश कारण आहे. मृणाल कुलकर्णी एका कार्यक्रमा दरम्यान सुमन कल्याणपुरकर यांना भेटल्या. ८० वर्षांच्या या गायिकेच्या आवाजावर मृणाल कुलकर्णी फिदा आहेत. मग सुमनजींना भेटल्यावर आपल्या आवडत्या गायिकेसोबत फोटो काढण्याचा मोह मृणाल कुलकर्णींना आवरता आला नाही.  याच फोटोच्या काही आठवणी मृणाल कुलकर्णींनी सीएनएक्स सोबत शेअर केल्या आहेत. मृणाल म्हणाल्या, मला सुमन कल्याणपुरकर यांचा आवाज फार आवडतो. त्यांनी आजपर्यंत अनेक अप्रतिम गाणी गायली आहेत. त्यांची गाणी एव्हरग्रीन असून ती सतत ऐकावीशी वाटतात. ठेहेरीये होश मे आओ तो चले जाईयेगा... हे त्यांचे गाणे तर मला अतिशय आवडते. मी त्यांना नूकतीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले तेव्हा त्यांच्याकडून आमची आवडती गाणी ऐकण्याचा योग आला. सध्या त्या पार्श्वगायन करीत नाहीत. माझ्या एखाद्या चित्रपटासाठी जर त्यांनी पार्श्वगायन केले असते तर मला खरच आवडले असते. सुमनजींच्या आठवणींमध्ये रमलेल्या मृणाल कुलकर्णींच्या या फोटोला मात्र सोशल मिडियावर अनेक लाईक्स मिळत आहेत.