देशभरातील 45 लोकेशन्सवर शूट झालाय ‘सॉरी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 12:59 IST
प्रत्येक सिनेमाचं आपलं एक वेगळेपण आणि आकर्षण असतं 'सॉरी' हा आगामी मराठी सिनेमा म्हणजे वेगळेपणांचं भंडारच आहे. एक शोधता ...
देशभरातील 45 लोकेशन्सवर शूट झालाय ‘सॉरी’
प्रत्येक सिनेमाचं आपलं एक वेगळेपण आणि आकर्षण असतं 'सॉरी' हा आगामी मराठी सिनेमा म्हणजे वेगळेपणांचं भंडारच आहे. एक शोधता बरयाच नावीन्यपूर्ण गोष्टी या सिनेमात पाहायला मिळतील. कथानक, अभिनय, गीत-संगितात, सादरीकरण,दिग्दर्शन यासोबतच देशभरातील सात राज्यांमधील विविध ४५ लोकेशन वर चित्रीत केला जाणं हे ‘सॉरी’चं खास वैशिष्टय आहे. वायडीजी फिल्म्सची निर्मिती असलेला ‘सॉरी’ या मराठी सिनेमाची निर्मिती योगेश दत्तात्रय गोसावी यांनी केली आहे. मनोरंजनासोबतच काहीतरी बोधप्रद असा विषय रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या योगेश गोसावी यांनीच ‘सॉरी’चं दिग्दर्शन केलं असून लेखन आणि संकलनही केलं आहे. या चित्रपटाची कथा एका नाटकाच्या लेखकाभोवती गुंफण्यात आली असून याचं चित्रीकरण देशभरातील सात राज्यांमध्ये करण्यात आलं आहे. यात जामा मस्जिद, पणजीतील बासालिका ऑफ बोम्स चर्च, धर्मशालातील बौद्ध मंदिर, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं प्रसिद्ध वैजनाथ शंकर मंदिर, अमृतसरमधील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिर या पाच महत्त्वाच्या विविध धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचाही समावेश आहे. सात राज्यांमधील 45 लोकेशन्सवर चित्रीत करणं हे रसिकांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आलेलं नसून कथानकाची गरज असल्याचं दिग्दर्शक योगेश गोसावी यांचं म्हणणं आहे.याबाबत ते म्हणतात की, कथानकातील एक महत्त्वाचा धागा पकडूनच या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले आहे. कलाकारांपासून तंत्रज्ञानापर्यंत सर्वाणीच आपापली कामा प्रामाणिकपणे केल्याने पडद्यावर जे चित्र दिसेल ते प्रेक्षकांना आकर्षित करणारं ठरेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक योगेश गोसावी यांनी आजच्या पिढीला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ आजच्या पिढीलाच नव्हे तर कामाच्या आहारी जाणारया सर्वांसाठीच ‘सॉरी’ हा सिनेमा म्हणजे घोक्याची घंटा आहे. सौरभ चिरमुल्ला, सुलक्षणा राय, समृद्धी पाचे, पूजा मेश्राम, माही कपूर, चंद्रकांत बामणे, डॉ. संजीवकुमार पाटिल आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. महिकापुर या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या असून दिपीका अविनाश फत्तेपूरकर लाईन प्रोडयूसर आहेत. छायांकनाची जबाबदारी हर्षद मुजुमदार यांनी सांभाळली असून विनोद वाळूंज आणि विजय जोगदंडे या जोडगोळीने सॉरी साठी कलादिग्दशण केलं आहे. चित्रपटातील गीतांना श्रीरंग ढवळे यांनी संगीत दिलं असून वेशभूषया माहि कपूर यांची आहे.