सोनालीचे आॅटम विंटर कलेक्शन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 13:00 IST
आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी विशेष प्रसिद्ध असलेली मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही देखील आपले फॅशन फंडे चाहत्यापर्यत पोहोचवत ...
सोनालीचे आॅटम विंटर कलेक्शन !
आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी विशेष प्रसिद्ध असलेली मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही देखील आपले फॅशन फंडे चाहत्यापर्यत पोहोचवत आहे. जीसिम्सचे कार्तिक निशानदार आणि अर्जुनसिंग बर्हान यांच्या प्रयत्नांमुळे आणखी एका मराठी कलाकाराचे क्लोथिंग ब्रँड आपल्याला बाजारात पाहायला मिळणार आहेत. आजच्या तरुणाईला आपल्या अभिनयाने आणि सौंदयार्ने वेड लावणारी सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रींने नुकतेच ठाणे येथील विवियाना मॉलच्या मॅक्स स्टोअरमध्ये मॅक्सच्या आॅटम विंटर कलेक्शन लाँच केले. यावेळी सोनालीने क्लॉट्स आणि जॅकेट्स घालून रॅम्प वॉकही केला तसेच मॅक्सच्या आॅटम विंटर कलेक्शनचं लुकबुकही लाँच केले. मी आज मॅक्सचं कलेक्शन लाँच करतेवेळी मॅक्सच्या स्टायलिश तसेच कंफर्टेबल असलेल्या क्लोट्स आणि जॅकेट्सची निवड केली. मॅक्सचे आउटफिट्स मला कायम आवडतात आणि याच ब्रॅण्डला मी प्रेझेंट करते आहे याचा मला खूप आनंद होतो आहे. मॅक्सच्या बोहेमिन कलेक्शनचं लुकबुकमध्ये माज्या आवडीचे कलेक्शन आहेत, मी जीसिम्सची खूप आभारी आहे. त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे मी आज मॅक्सचं आॅटम विंटर लुकबुक लाँच करते आहे.