Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी सिनेमात मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी पुन्हा झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 09:46 IST

टॅलेंटेड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने दिल चाहता है, मिशन कश्मीर, प्यार तुने क्या किया, डरना जरूरी है, टॅक्सी नं ...

टॅलेंटेड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने दिल चाहता है, मिशन कश्मीर, प्यार तुने क्या किया, डरना जरूरी है, टॅक्सी नं 9211 यासारख्या हिंदी सिनेमांत अविस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या. एक अभिनेत्री म्हणून तिने मराठी, कन्नड, गुजराती आणि तमिळ सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्याशिवाय नाटकांच्या माध्यमातून रंगमंचावरही ती सक्रीय आहे. सोनालीने कायमच आपल्या कलेने अनेक रसिक प्रेक्षकांना आकर्षित केले असून लवकरच ती सुप्रसिद्ध अभिनेता नसिरुद्दीन शहा यांच्या सोबत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.हे दोन्ही अभिनेते आगामी कौटुंबिक मनोरंजक सिनेमा ‘होप और हम’ करिता स्क्रीन शेअर करतील. अनेक वर्षांनंतर सोनाली हिंदी सिनेमात परतली असून ती मुख्य भूमिकेत दिसेल. या सिनेमाची धुरा प्रख्यात अॅड फिल्ममेकर सुधीर बंडोपाध्याय यांनी सांभाळली असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे. ‘होप और हम’ ही मुंबईत राहणाऱ्या कुटुंबाची अर्थपूर्ण कथा असून त्यांचे जीवन सिनेमॅटीक प्रवासातून उलगडत जाते. पीव्हीआर पिक्चर्सच्या साथीने थम्बनेल पिक्चर्स हा सिनेमा सादर करत असून 11 मे 2018 पासून तो चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.  या मराठमोळ्या सोकुल अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे. मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे.चाळीशीत असलेली सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. तिच्या या फिटनेसचे एक खास आणि विशेष कारण आहे.सोनालीला सायकलिंगची आवड आहे.ती उत्तम सायकलिस्ट आणि रनर आहे हे फार कमी जणांना माहिती आहे. ती नेहमी खारपासून वर्सोवा किंवा बांद्रापर्यत सायकलिंग करत असते. आपल्या सायकलिंगपासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी आणि फिट राहावे यासाठी स्वतःचे सायकलिंग आणि रनिंग करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.