Join us
Daily Top 2Weekly Top 5

"काही मैत्री रातोरात होत नाही...",भूषणची 'घरत गणपती'मधील सहकलाकार निकितासाठी खास बर्थडे पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:15 IST

Bhushan Pradhan's special birthday post for Nikita Dutta : अभिनेता भूषण प्रधानने नुकताच त्याची आगामी चित्रपट 'घरत गणपती' मधील सहकलाकार निकिता दत्ता हिच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

अभिनेता भूषण प्रधान मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मराठी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. मागील वर्षी त्याचा घरत गणपती हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात त्याच्यासोबत अभिनेत्री निकिता दत्ता मुख्य भूमिकेत होती. या सिनेमातील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. दरम्यान नुकतेच भूषणने निकिताच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता भूषण प्रधानने नुकताच त्याची आगामी चित्रपट 'घरत गणपती' मधील सहकलाकार निकिता दत्ता हिच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. निकितासोबतचे सुंदर फोटो शेअर करत भूषणने त्यांच्या मैत्रीचे वर्णन करणारी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिले की, "काही मैत्री रातोरात होत नाही... ती हळूहळू, स्थिरपणे, सहजतेने, आदरपूर्वक आणि खूप हास्याच्या क्षणांसोबत वाढत जाते. आपले नाते अगदी तसेच आहे... वेळेनुसार खरे आणि सहज. आपल्या दोघांचे वाढदिवस चुकले आहेत (माझी चूक), पण यावर्षी मी त्याची कसर पूर्ण करत आहे... प्रत्यक्ष भेटून आणि सोशल मीडियावरही!"

भूषणने त्यांच्या मैत्रीचे महत्त्व सांगितले, "आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या असोत किंवा नसोत, पण आपण नेहमी एकमेकांच्या भल्याचाच विचार केला आहे आणि याचमुळे हे बंधन खास आहे. येथून पुढे हे नाते अधिक घट्ट होत जावो... अधिक आपुलकी, अधिक मजा आणि ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन खूप साऱ्या आठवणी जमा होत राहोत." शेवटी त्याने निकिताला शुभेच्छा देताना लिहिले की, "तुला आनंद देणारे चांगले काम, तुला साथ देणारे चांगले आरोग्य... आणि नेहमी तुझ्या सभोवती असलेले प्रेम मिळो! आणि मी विसरण्यापूर्वी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा निकिता. 

वर्कफ्रंटभूषण प्रधानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे. त्याने अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे. त्याने जुनं फर्नीचर, कॉफी आणि बरंच काही, 'लंडन मिसळ', 'मिस यू मिस्टर' आणि 'कॉलेज डायरीज' यांसारख्या सिनेमात काम केलंय. तर निकिता दत्ता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती 'कबीर सिंग', 'गोल्ड' आणि 'द बिग बुल' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. तिने 'घरत गणपती' सिनेमातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलंय. यातील तिची आणि भूषणची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. तिने 'एक दूजे के वास्ते' या मालिकेतूनही लोकप्रियता मिळवली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhushan's heartfelt birthday wish for Nikita, his 'Gharat Ganpati' co-star.

Web Summary : Bhushan Pradhan shared a special birthday post for Nikita Dutta, his co-star from 'Gharat Ganpati'. He reminisced about their friendship, highlighting its gradual growth, respect, and shared laughter. He wished her success, good health, and love.
टॅग्स :भुषण प्रधान