Join us
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती बालगुडे आहे हत्ती प्रेमी, नुकताच शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 12:14 IST

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर सक्रीय असते आणि या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर सक्रीय असते आणि या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेला कुटुंबासोबत व्हॅकेशनला गेली होती. तिथून देखील ती तिच्या चाहत्यांना अपडेट देत होती. नुकताच तिने हत्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यात ती हत्तीला मिठी मारताना दिसते आहे. 

संस्कृतीने हत्तीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, संपूर्ण दिवसानंतर जेव्हा आई तुम्हाला मिठीत घेते तेव्हा जशी फिलिंग मिळते तशी सारखीच मला हत्तीसोबत मिळाली. खरेच... मस्करी करत नाही. हा क्षण मी शब्दांत सांगू शकत नाही. थकले आहे.

संस्कृती बालगुडे हत्ती प्रेमी आहे हे सर्वांना चांगलंच माहित आहे. कारण संस्कृतीने हातावर छोट्या हत्तीचा सुंदर टॅटू बनवला आहे. 

गेल्या महिन्यात संस्कृतीचा 'सर्व लाइन व्यस्त आहेत' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात संस्कृती व्यतिरिक्त सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, महेश मांजरेकर, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. विशेष म्हणजे सुरुवातीला अभिनय क्षेत्रात करियर करण्याबाबत फारशी गंभीर नव्हती. त्याचवेळी अभिनेत्री सुमुखी पेंडसेने संस्कृतीला एक सल्ला दिला. तिने संस्कृतीला THE DEVILS WEARS PRADA हा हॉलीवुडचा सिनेमा पाहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार संस्कृतीने हा सिनेमा पाहिला. हा हॉलीवुडचा सिनेमा पाहून आपल्यात बदल घडल्याची कबुली खुद्द संस्कृतीने दिली आहे.

टॅग्स :संस्कृती बालगुडे