Join us

आदिवासी मुलीच्या भूमिकेत स्मिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 18:39 IST

            अभिनेत्री स्मिता गोंदकर आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळते. आतादेखील स्मिता तिच्या चाहत्यांना ...

 
           अभिनेत्री स्मिता गोंदकर आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळते. आतादेखील स्मिता तिच्या चाहत्यांना माचीवरचा बुधा या चित्रपटात वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटातील तिचे काही एक्सक्लुझिव्ह फोटो तिने सीएनएक्ससोबत शेअर केले आहेत. तसेच या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल स्मिता सांगते, हा चित्रपट गो.नी दांडेकर यांच्या एका कथेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मला आदिवासी मुलीची भूमिका साकारायला मिळाली. लोणावळ्यातील राजमाची या ठिकाणी आम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. तिथे राहणाऱ्या आदिवासी लोकांची आम्हाला फारच मदत झाली. त्यांची बोली भाषा, थोडे वेगळे शब्द आणि लहेजा मला शिकता आला. राजमाची हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात आहे. तिथे व्हॅनिटी नेणे शक्य नसायचे मग शूटला जाताना आम्ही जेसीबी घेऊन जायचो. मला अ‍ॅडव्हेंचरस गोष्टी करण्याची आवड असल्याने मी या चित्रपटाचे संपूर्ण शुटिंग फारच एन्जॉय केले.