Join us

स्मिता शेवाळे करणार पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 17:35 IST

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री स्मिता शेवाळे हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच कालावधीपासून चित्रपटांपासून दूर असणारी ...

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री स्मिता शेवाळे हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच कालावधीपासून चित्रपटांपासून दूर असणारी प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री लवकरच एका आगामी  चित्रपटाच्या माध्यमातून  पुनरागमन करत आहे. तिच्या या पुनरागमन विषयी अभिनेत्री स्मिता शेवाले लोकमत सीएनएक्सला सांगते,           लग्नानंतर बराच काळ चित्रपटातून ब्रेक घेतला होता. मध्यंतरीच्या काळात व्यायाम, योगसाधना वगैरे केल्यामुळे मातृत्व आणि बऱ्याच कालावधीनंतर सुरू केलेले चित्रपटातील काम यांचा मला त्रास झाला नाही. जसा सर्वसामान्य स्त्रीला स्वतःसाठी वेळ मिळत नाही, त्याचप्रमाणं आई, पत्नी, सून, मुलगी आणि एक व्यावसायिक अभिनेत्री या सगळ्या रूपांना न्याय देता देता माझी इतर स्त्रियांसारखीच दमछाक होते. पण पुन्हा प्रेक्षकांसमोर येताना खूप आनंद वाटत असल्याचे यावेळी तिने सांगितले. मात्र तिच्या या आगामी चित्रपटाचे नाव अदयापदेखील गुलदस्त्यात आहे. त्याचबरोबर या चित्रपटात तिची काय भूमिका असणार आहे हेदेखील कळाले नाही. मात्र स्मिताच्या पुनरागमने तिचे चाहते आनंदी झाले असतील हे नक्की.               यंदा कर्तव्य आहे, यापूर्वी स्मिताने  लाडीगोडी , धामधूम , मन्या सज्जना, दम असेल तर, वन रूम किचन, चल लवकर  असे एकापेक्षा एक सरस चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. तसेच तिने मांडला दोन घडीचा डाव, सावित्री, चारचौघी, श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी अशा अनेक मालिकेतून या अभिनेत्रीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आता ही अभिनेत्री पुन्हा नव्याने आपल्या आगामी चित्रपटात येण्यास सज्ज झाली आहे.