स्मिता दिसणार वेगळ््या लुकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 14:32 IST
अभिनेत्री स्मिता तोब आपल्याला नेहमीच तिच्या चित्रपटांमध्ये वैविध्यपुर्ण भूमिकांमध्ये पहायला मिळते. आता पुन्हा एकदा ...
स्मिता दिसणार वेगळ््या लुकमध्ये
अभिनेत्री स्मिता तोब आपल्याला नेहमीच तिच्या चित्रपटांमध्ये वैविध्यपुर्ण भूमिकांमध्ये पहायला मिळते. आता पुन्हा एकदा स्मिता आगामी ट्रकभर स्वप्न या चित्रपटामध्ये एकदमच वेगळ््या लुकमध्ये प्रेक्षकांना दिसणार असल्याचे समजतेय. स्मिताने या चित्रपटातील भूमिकेसाठी देखील अतिशय मेहनत घेतली असुन तिने या रोलसाठी बरीच तयारी केल्याचे देखील कळतेय. नितीन चंद्रकांत देसाई यांचा ट्रकभर स्वप्न हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री क्रांती रेडकर, मकरंद देशपांडे यांच्या देखील भूमिका आहेत. आता स्मिता नक्की कोणत्या लुकमध्ये प्रेक्षकांना दिसणार हे अजुन तरी गुलदस्त्यातच आहे. काही दिवसात स्मिताचा हा नवीन लुक प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.