Join us

'सिरी सिद्धार्थ गौतम' महाराष्ट्रात होणार ट्रक्स फ्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 18:31 IST

श्रीलंका, चीन, जपान, थायलँड या देशात 'सिरी सिद्धार्थ गौतम' हा चित्रपट हिट ठरला आहे. आता याच चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण ...

श्रीलंका, चीन, जपान, थायलँड या देशात 'सिरी सिद्धार्थ गौतम' हा चित्रपट हिट ठरला आहे. आता याच चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हा चित्रपट महाराष्ट्रातदेखील टॅक्स फ्री करणार असल्याची घोषणा मुख्यामंत्र्यांनी केली आहे. अवघ्या जगाला विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांचे पूवार्युष्य आणि गृहत्याग-संसार त्याग करून ते भगवान गौतम बुद्ध कसे बनले? हे पाहाण्यासाठी मी ही उत्सुक असल्याचे मुख्यमंत्री देवेंन्द फडणवीस यांनी सांगितले. या चित्रपटात गगन मलिक, गौतम गुलाटी,आँचल सिंह या बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट धम्मचक्र प्रवर्तनदिन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.