Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सिद्धार्थ चांदेकर रसिका सुनीलसोबत गेला मुव्ही डेटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 18:11 IST

सिद्धार्थ चांदेकर नुकताच एका अभिनेत्रीसोबत मुव्ही डेटवर गेला होता आणि त्याने त्याबाबतची पोस्ट इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगला टाकली होती. ...

सिद्धार्थ चांदेकर नुकताच एका अभिनेत्रीसोबत मुव्ही डेटवर गेला होता आणि त्याने त्याबाबतची पोस्ट इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगला टाकली होती. याबाबत सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या अभिनेत्रीसोबत त्याचे प्रेमप्रकरण सुरू आहे की केवळ मित्रमैत्रीण म्हणून ते डेटवर गेले होते याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे.  सिद्धार्थ चांदेकरने अग्निहोत्र या मालिकेद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटात काम केले. त्याच्या सगळ्याच चित्रपटांतील भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. त्याने मराठीसोबतच काही हिंदी मालिकांमध्येदेखील काम केले आहे. सिद्धार्थला आज तरुणींच्या दिलची धडकन मानले जाते. त्याने नुकतेच इन्स्टाग्रामला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया म्हणजेच रसिका सुनीलसोबत एक फोटो पोस्ट केला होता आणि या फोटोसोबत हॅशटॅगचा वापर करत मुव्हीडेट असे लिहिले आहे. या फोटोला अनेकांनी लाइक्स दिल्या असून यावर अनेक कमेंट्सदेखील आल्या आहेत. तरुणींनी तर त्यांचे सिद्धार्थने हार्ट ब्रेक केले असल्याचे म्हटले आहे. केवळ प्रियकर प्रेयसीच नव्हे तर चांगले मित्रमैत्रीणदेखील चित्रपटाच्या डेटवर जात असतात. त्यामुळे रसिका आणि सिद्धार्थ केवळ मित्रमैत्रीण म्हणून चित्रपट पाहायला गेले असतील असे म्हणण्यास काहीही हरकत नाही. पण यामुळे सिद्धार्थवर प्रेम करणाऱ्या मुलींना चांगलाच राग आला आहे असेच म्हणावे लागेल.काही दिवसांपूर्वी महिला दिनानिमित्त सिद्धार्थने एक फोटो शेअर केला होता. त्यात त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या स्त्रींचे फोटो त्याने पोस्ट केले होते. या फोटोतदेखील रसिकाचा समावेश होता. त्यामुळे सध्या रसिका आणि सिद्धार्थच्या अफेअरच्या चर्चांना चांगलेच ऊत आले आहे.