Join us

तेजस्विनी पंडितला 'या' नावाने हाक मारतो सिद्धार्थ जाधव, अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:52 IST

तेजस्विनीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता सिद्धार्थ जाधवने खास पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थ आणि तेजस्विनी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. तेजस्विनीला सिद्धार्थ एका खास नावाने हाक मारतो.

तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. कठीण परिश्रम आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्रीने सिनेसृष्टीत स्वत:चं नाव कमावलं. तेजस्विनीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्रीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त चाहते सोशल मीडियावरुन तेजस्विनीला शुभेच्छा देत आहेत. 

तेजस्विनीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता सिद्धार्थ जाधवने खास पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थ आणि तेजस्विनी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. तेजस्विनीला सिद्धार्थ एका खास नावाने हाक मारतो. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टमधून याचा उलगडा झाला आहे. तेजस्विनीला सिद्धार्थ बंड्या या नावाने हाक मारतो. "हॅपी बर्थडे बंड्या...आयुष्यात अशीच मॅड राहा...खूप प्रेम..खूप म्हणजे खूप", असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनीही तेजस्विनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, तेजस्विनी एक अभिनेत्री असण्यासोबतच निर्मातीदेखील आहे. 'अगं बाई अरेच्चा', 'मी सिंधुताई सपकाळ', 'आदिपुरुष', 'ये रे ये रे पैसा', 'तु ही रे' या सिनेमांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका गाजल्या. 'अहो विक्रमार्का' या सिनेमातून तेजस्विनीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तर 'येक नंबर', 'बांबू' अशा सिनेमांची तिने निर्मिती केली आहे.

टॅग्स :तेजस्विनी पंडितसिद्धार्थ जाधव