Join us

​सिद्धार्थ चांदेकरचे ट्विटर अकाऊंट झाले व्हेरिफाइड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 18:01 IST

सिद्धार्थ चांदेकरने अग्निहोत्र या मालिकेद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तो झेंडा, बालगंर्धव, सतरंगी रे, क्लासमेट्स, वजनदार यांसारख्या चित्रपटांमध्ये काम ...

सिद्धार्थ चांदेकरने अग्निहोत्र या मालिकेद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तो झेंडा, बालगंर्धव, सतरंगी रे, क्लासमेट्स, वजनदार यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. सिद्धार्थने खूपच कमी वेळात मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. सिद्धार्थच्या या यशासाठी त्याचे नेहमीच कौतुक केले जाते. सिद्धार्थ गेल्या कित्येक दिवसांपासून खूप खूश आहे. कारण काही दिवसांपूर्वी त्याचे फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम अकाऊंट व्हेरिफाइड करण्यात आले. तो नेहमीच त्याच्या फेसबुक पेजवर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर अॅक्टिव्ह असतो. काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनायासोबत त्याने टाकलेल्या एका पोस्टची चांगलीच चर्चा झाली होती. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबतच सिद्धार्थ ट्विटर या सोशल नेटवर्किग साइटवरदेखील चांगलाच अॅक्टिव्ह असतो. तो त्याचे अनेक फोटो, व्हिडिओ ट्विटरवर नेहमी पोस्ट करत असतो. तसेच त्याच्या मित्रमैत्रिणींच्या वाढदिवशी त्यांना त्यांच्या अकाऊंटवरून शुभेच्छा देत असतो. सतत ट्विटरला अॅक्टिव्ह राहाण्याचा सिद्धार्थला चांगलाच फायदा झाला आहे. नुकतेच त्याचे ट्विटर अकाऊंटदेखील व्हेरिफाइड झाले आहे. त्याच्या अकाऊंटवर एकूण अठरा हजारहूनही अधिक फॉलोव्हर्स आहेत तर त्याने चार हजारांहून अधिक ट्वीट केले आहेत. सिद्धार्थचे अकाऊंट व्हेरिफाइड झाल्याचा त्याला प्रचंड आनंद झाला आहे. त्याने त्याचे अकाऊंट व्हेरिफाइड झाल्यानंतर लगेचच ट्विटरचे आभार मानले आहेत. मराठी इंडस्ट्रीत अनेक कलाकारांना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ब्ल्यू स्टिक मिळाली आहे. सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, उर्मिला कानेटकर-कोठारे, स्पृहा जोशी या कलाकारांचे ट्विटर अकाऊंट आतापर्यंत व्हेरिफाइड झाले आहे.