Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज’ची शॉर्टलिस्ट जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 22:38 IST

इंग्लिश साहित्यासाठी दिला जाणारा मानाचा पुरस्कार म्हणजे ‘मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज’. यंदाच्या पुरस्कारासाठी नामांकित सहा पुस्तकांची नावे (शॉर्टलिस्ट) जाहीर ...

इंग्लिश साहित्यासाठी दिला जाणारा मानाचा पुरस्कार म्हणजे ‘मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज’. यंदाच्या पुरस्कारासाठी नामांकित सहा पुस्तकांची नावे (शॉर्टलिस्ट) जाहीर करण्यात आली आहेत. इटालियन लेखक एलेना फेरन्टे  आणि नोबेल पारितोषिक विजेते ओरहान पामुक यांच्या पुस्तके या शॉर्टलिस्टचे वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडातील लेखकांच्या कादंबऱ्याचादेखील यामध्ये सामावेश आहे. 2006 साली ओरहान पामुक यांना साहित्याचे नोेबेल पारितोषिक मिळाले होते. तर फेरन्टे यांच्या नेपल्स शहरातील मैत्री आणि जीवनबद्दल असणाऱ्या चारही कादंबऱ्या बेस्टसेलर आहेत. परंतु एलेना फेरन्टे कोण आहे याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. क्वचितच त्या मुलाखत देतात.जगभरातील भाषांतून लिहिलेल्या परंतु इंग्रजीमध्ये अनुवादित कादंबºयांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मुळ लेखक आणि भाषांतरकारामध्ये पुरस्काराची बक्षीसाचे (50 हजार पौंड - सुमारे 47 लाख रु.) समान वाटप करण्यात येते. 16 मे रोजी विजेत्याची घोषणा करण्यात येणार आहे.फायनल सिक्स :1. ओरहान पामुक - अ स्ट्रेंजनेस इन माय माइंड (तुर्कस्थान)2. एलेना फेरन्टे - द स्टोरी आॅफ द लॉस्ट चाईल्ड (इटली)3. जोसे एड्युआर्डो अग्येलुसा - अ जनरल थेअरी आॅफ आॅब्लिवियन (अंगोला)4. हँग कँग - द व्हेजेटेरियन (द. कोरिया)5. रॉबर्ट सीथेलर - अ व्होल लाईफ (आॅस्ट्रिया)6. यान लियांके - द फोर बुक्स