Join us

शिवानी रांगोळे '&' तिची 'जरा हटके' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 13:11 IST

 इरॉस इंटरनॅशनल च्या क्रीशिका लुल्ला प्रस्तुत आणि दिग्दर्शक रवी जाधव निर्मित '& जरा हटके' या चित्रपटामार्फत प्रेक्षकांसमोर येणारी शिवानी ...

 इरॉस इंटरनॅशनल च्या क्रीशिका लुल्ला प्रस्तुत आणि दिग्दर्शक रवी जाधव निर्मित '& जरा हटके' या चित्रपटामार्फत प्रेक्षकांसमोर येणारी शिवानी रांगोळी दिसायला अल्लड, अवखळ आणि तितकीच चुलबुली असणाºया शिवानीला आपण लवकरच '& जरा हटके' या चित्रपटातून पाहणार आहोत. 'आस्था' या १७ वर्षाच्या मुलीची भूमिका ती या सिनेमात करत असून त्यामध्ये ती पॉजिटीव्ह, समजूतदार पण वयाबरोबरच खेळकर अशी आहे. शिवानी देखील आपल्या भूमिकेबद्धल खूप उत्सुक असल्याचे सांगते. किशोर वयात आलेल्या मुलीची मानसिकता आणि भावना अगदी तत्परतेने तिने या चित्रपटातून मांडली आहे. बालपण आणि तरुणपण अशा संवेदनशील वयात आलेली ही कॉलेज तरुणी आधुनिक विचारांची, आणि स्वच्छंद आयुष्य जगणारी आहे. तिला स्वत:चे विचार आणि स्वातंत्र्य आहे, त्यामुळे आपल्या आईच्या पुनर्विवाह करण्याच्या निर्णयावर तिच्या नजरेतून बदलत जाणारी मानसिकता, तसेच एकाबाजूला आईच्या लग्नासाठी खुश असतानाच दुसरीकडे वडिलांच्या जागेवर कोणा दुसºयाला पाहताना तिला होणारा त्रास, अगदी मार्मिक आणि भावनिक पद्धतीने या चित्रपटात साकारताना दिसणार आहे. कालानुरूप बदलत जाणाºया नात्यांच्या समीकरणात अडकलेल्या 'आस्था' या व्यक्तिरेखाला योग्य न्याय देण्याचे मोठे आव्हान शिवानीने आपल्या अभिनयाच्या बळावर लीलया पेलले आहे.  '& जरा हटके' मधील तिने साकारलेली 'आस्था'  तिच्या अभिनय कारकिदीर्ला एक नवा आयाम देणारा ठरणार आहे.