Join us

शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 21:49 IST

               सारा एंटरटेन्मेंट निर्मित, विद्रोहीजलसाच्या सहकायार्ने रंगमळा सादर करीत असलेल्या नंदू माधव ...

               सारा एंटरटेन्मेंट निर्मित, विद्रोहीजलसाच्या सहकायार्ने रंगमळा सादर करीत असलेल्या नंदू माधव दिग्दर्शित आणिभगवान मेदनकर यांची निर्मिती असलेल्या ह्लशिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगरमोहल्लाह्व या नाटकाचे तब्बल ४५०हून अधिक प्रयोग रंगभूमीवर गाजले असून अनेकपुरस्कारांवर ही या नाटकाने आपली मोहोर उमटवली आहे. नुकताच बालगंधर्वनाट्यमंदिर पुणे येथे या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. याप्रयोगाला न भूतो न भविष्य असा कोणत्याही नाटकाला रसिक प्रेक्षकांचाउदंड प्रतिसाद मिळाला नव्हता. तसा या नाटकाला रसिकांचा प्रतिसाद मिळाला.रंगमंदिराच्या स्टेजवर बसून रसिकांनी तर खुर्चीच्या बाजूला खाली बसूनप्रेक्षकांनी हे नाटक पाहिले. एवढा मोठा प्रतिसाद पाहून नाटकातील कलाकारव निमार्ते भगवान मेदनकर अक्षरश: भाराहून गेले होते. या नाटकाचा विदर्भ वमराठवाडा दौरा नुकताच झाला तिकडे हि रसिकांचा उंदड प्रतिसाद मिळाला. यानाटकाची गीते  संकल्पना व संगीत  संभाजी भागत, लेखक राजकुमार तागडेआहे.  या नाटकाचा विषय मनाला भिडणारा असा असून कलाकारांचा अभिनयही उत्तम असल्याचे मत नाटकाला रसिक प्रेक्षकांनीयाप्रसंगी व्यक्त केले. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला यानाटकाबद्दल एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, हे नाटक खरा शिवाजी हा कुठल्या एका जातीचा,धमार्चा, समाजाचा किवा प्रांताचा नसून ते कष्टकत्यार्चा, पिडितांचा आणि शोषितांचा व यासोबतच माणूस म्हणूनमाणसाप्रमाणे जगणा?्याचा   होता. आजही जे ही माणुसकी टिकवण्यसाठीजातीधर्माच्या पलिकडे जाऊन माणुसकीसाठी लढत आहेत त्यांचात तो जिवंत आहेत, राजे कुठलेही दैवी अवतार नसून ते एक माणूस होते ही खूप महत्वाची बाब डोळ्यासमोर आणण्याचे काम हे नाटक करते.आजच्या समाज व्यवस्थेसमोर जातीयतेची जी भिंत उभी आहे ते पाडण्याची ही एक अप्रतिम चळवळ म्हणजे हे नाटक आहे. असे नाटकाचे निमार्ते भगवान मेदनकर यांनी सांगितले.