Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘शेखर खोसला…’ ची टीम सुबोध भावेसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 12:38 IST

                विले पार्ले येथील दिनानाथ नाट्यगृह येथे भद्रकाली प्रॉडक्शनची ५१वी नाट्यकलाकृती ‘हा शेखर ...

                विले पार्ले येथील दिनानाथ नाट्यगृह येथे भद्रकाली प्रॉडक्शनची ५१वी नाट्यकलाकृती ‘हा शेखर खोसला कोण आहे’ या नाटकाचा ५१ वा प्रयोग संपन्न झाला. मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार या प्रयोगावेळी उपस्थित होते.

        सुबोध भावे, सचिन खेडेकर, अरुण काकडे सर, सुनिल बर्वे, कोरिओग्राफर उमेश जाधव या कलाकार मंडळींनी पहिल्या रांगेत बसून या सुंदर नाटकाचा अनुभव घेतला. सुप्रसिध्द ऍड- गुरु भरत दाभोळकरांनी देखील या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित होते.  

            लोकेश गुप्तेंनी क्लिक केलेल्या या सेल्फीमध्ये सुबोध, सुनील यांच्यासह 'शेखर खोसला...' ची टीम, दिग्दर्शक विजय केंकरे, निर्माते प्रसाद कांबळी, मधुरा वेलणकर, शर्वरी लोहोकरे, तुषार दळवी, विवेक गोरे, सुशील इनामदार, नेपथ्यकार प्रदिप मुळ्ये, शितल तळपदे, पोश्टर बॉय सचिन गुरव, उमेश आदी मंडळी दिसत आहेत. तसेच ही सर्व मंडळी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत हे या सेल्फीतून दिसून येते.