शरद केळकर झळकणार जॉन अब्राहिमसोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 04:51 IST
संघर्षयात्रा या चित्रपटातून गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेत असणारा अभिनेता शरद केळकर आता, निशिकांत कामत दिग्दर्शित रॉकी हॅण्डसम या चित्रपटात ...
शरद केळकर झळकणार जॉन अब्राहिमसोबत
संघर्षयात्रा या चित्रपटातून गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेत असणारा अभिनेता शरद केळकर आता, निशिकांत कामत दिग्दर्शित रॉकी हॅण्डसम या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात बॉलीवुडचा तगडा कलाकार जॉन अॅब्राहिम व अभिनेत्री श्रुती हसन देखील आहे. शरद केळकर या अभिनेत्याने बॉलीवुड व मराठी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. यापूर्वी शरद लय भारी, उत्तरायण या मराठी चित्रपटात तर हलचल, गोलिंयो की रासलीला-रामलीला, हिरो या बॉलीवुड चित्रपटात झळकला आहे. पण सध्या शरद केळकरचा गोपीनाथ मुंडे यांची भूमिका असणारा चित्रपट संघर्षयात्रा काही वादग्रस्त कारणांमुळे या चित्रपटाचे प्रदर्शित होण्याची तारीख लांबणीवर पडली आहे.