Join us

आमिरसह सई ताम्हणकरचं अमरावतीमध्ये श्रमदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 10:10 IST

राज्यातील दुष्काळ परिस्थिती पाहता सत्यमेव जयते  सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्तील गावांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता आमीर खानसह,रिमा लागू, ...

राज्यातील दुष्काळ परिस्थिती पाहता सत्यमेव जयते  सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्तील गावांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता आमीर खानसह,रिमा लागू, सई ताम्हणकर, सुनिल बर्वे अमरावतीमध्ये पोहोचले आहे. वाठोडा या गावात पहाटे पासून या कलाकारांनी श्रमदानाला सुरुवात केली होती. इंडस्ट्रीतील या कलाकारांनी श्रमदानाला सुरुवात केल्याने गावकºयामध्येही  हुरुप चढला आणि त्यांनी कामाला सुरुवात केली.आमीर गावात येणार असल्याने पहाटे तीन वाजल्यापासून त्याच्या स्वागताची तयारी केली होती. आमीर खान सह आपले मराठी कलाकार सहा वाजता वाठोडयात पोहोचले आणि थेट कामाला सुरुवात केली. एकूण दीडशे गावं वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यापैकी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस ६०लाख तर त्यानंतर दुसºया आणि तिसºया क्रमांकासाठी अनुक्रम ३०आणि २० लाख बक्षीस दिले जाणार आहे. एखाद्या स्पर्धेच्या माध्यमातून दुष्काळ घालवण्याची ही पहिलीच अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.