Join us

पाहा या संगीत वेबसिरीजचा टिझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 13:03 IST

कवितेचा गाणं होतांना या सलीली कुलकर्णी यांच्या पहिल्या संगीत वेबसिरिजचा टिझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. ८ जानेवारीला या वेबसिरिजचा पहिला एपिसोड प्रदर्शित होणार आहे. तेव्हा सर्वांना समजेल की या वेबसिरिजमध्ये नक्की काय आहे. एका वेगळ््या विषयावर, कवितेंच्या वाटेवर रसिकांना घएऊन जाणारी ही वेबसिरिज प्रेक्षकांना आवडू शकते असे टिझर पाहिल्यावर तरी वाटु शक

कवितेचा गाणं होतांना या सलीली कुलकर्णी यांच्या पहिल्या संगीत वेबसिरिजचा टिझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. ८ जानेवारीला या वेबसिरिजचा पहिला एपिसोड प्रदर्शित होणार आहे. तेव्हा सर्वांना समजेल की या वेबसिरिजमध्ये नक्की काय आहे. एका वेगळ््या विषयावर, कवितेंच्या वाटेवर रसिकांना घएऊन जाणारी ही वेबसिरिज प्रेक्षकांना आवडू शकते असे टिझर पाहिल्यावर तरी वाटु शकते. संगीतावर, कवितांवर आणि सर्वांच्या जवळचा विषय असलेल्या गाण्यांवरील ही पहिलीच वेब सिरिज असणार आहे. या वेब सिरिजचे नाव देखील एकदम भन्नाट आहे. कविता आणि गाणं या दोघांमधील प्रवास नक्की असतो तरी कसा हे यातून सांगण्यात आलंय. एखादया कवितेला चाल देऊन तिचं गाण कसं काय तयार होते याचा उलगडा यामध्ये करण्यात येणार आहे. याविषीयी बोलताना सलील कुलकर्णी सांगतात, एखादी कविता जेव्हा चालीमध्ये फुलत जाते ना तो आनंदच काही वेगळाच असतो. संगीतकाराची भूमिका एखादया टुरीस्ट गाईड सारखी असते. तो कवितेच्या गावातील सर्व सौंदर्यस्थळे तुम्हाला दाखवित असतो. तसं म्हंटल तर कवितेला जर चाल लावायला गेलो  तर पाच मिनिटात पण चाल लावली जाऊ शकते. पण मग ती उगाचच मानगुटीवर बसवलेली चाल होते. सहज सुचलेली चाल त्या कवितेला जास्त पुढे घेऊन जाते. पुष्कळदा आपल्याला वाटते की आपल्या घराच्या खिडकीच्या तुकड्यातून जेवढे आकाश दिसते तेवढेच ते आहे. परंतू तसे नसते, आकाश के उस पार भी आकाश है... तसेच कवितांचे आहे, तशीच गाणी असतात कागदावरील अक्षरांच्या पलिकडे जेव्हा संगीतकाराला काही दिसतं तेव्हाच त्या कवितेच गाणं होतं. अशाप्रकाच्या भावना सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या आहेत. लवकरच आपल्याला ही अनोखी कवितेचं गाणं होतांना वेबसिरिज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नेटिझन्समध्ये नक्कीच सध्या आनंदाचे वातावरण असणार आहे. एवढेच नाही तर अनेक कवी आणि कविताप्रेमांसाठी ही वेबसिरिज म्हणजे नवीन वर्षाच गिफ्ट देखील आहे.