पाहाः बाप्पाच्या जयजयकार करणारी मराठी सिनेमातल्या गाण्यांची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 11:33 IST
बाप्पाच्या जयजयकारात मराठी सिनेमातल्या गाण्यांचीही झलक दिसते.
पाहाः बाप्पाच्या जयजयकार करणारी मराठी सिनेमातल्या गाण्यांची झलक
आसंमतामध्ये बाप्पा मोरयाचा जयघोष घुमू लागलाय... बाप्पाच्या जयजयकारात मराठी सिनेमातल्या गाण्यांचीही झलक दिसते... मराठी सिनेमातल्या गाण्यांमध्ये कलाकार बाप्पाचरणी नेहमीच नतमस्तक झालेत...त्यामुळंच की 'भिकारी' सिनेमातला स्वप्नील जोशी विघ्नविनाशक मोरयाला त्याची शान आणि शक्ती मानतोय.... बाप्पा भक्ताची दुःख आणि दृष्टांचा संहार करतात... त्यामुळंच झपाटलेला-2 सिनेमात गजमुखा गजाननाचं जयजयकार करण्यात आला. गणराय भक्तांना कधीही निराश करत नाही.. बाप्पाचा जयघोष करत त्यांना साद घालण्याचा आनंद शिंदेंनी अरे आवाज कुणाचा सिनेमात प्रयत्न केला. मराठी सिनेमात बाप्पाची सर्वाधिक जयघोष झाला तो मोरया सिनेमात... तुच माझी आई म्हणत थेट बाप्पाशी संवाद सुपरहिट ठरला. मोरया सिनेमातल्या श्रीगणेशाची स्तुती करणा-या अवधूतच्या कव्वालीनंही रसिकांची मनं जिंकली. देवा तुझ्या दारी आलो म्हणत अजय-अतुलनं मराठी सिनेमाला बाप्पाचं एक हिट गाणे दिलं. जय देव जय देव म्हणत नवरा माझा नवसाचा सिनेमात सारेच गणरायाचरणी लीन होतात. अलीकडच्या काळातच रुपेरी पडद्यावर बाप्पाची भक्ती दिसली असं नाही.प्रथम तुला वंदितो हे गाणं आजही प्रत्येक घरात आणि मंडळांमध्ये आवर्जून लावलं जातं. अष्टविनायक सिनेमातून श्री अष्टविनायकाचं दर्शन कोण बरं विसरु शकेल. चला तर मग आपणही लीन होऊया अष्टविनायक दर्शनात....