Join us

​ पाहा वणव्याची पहिली ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 14:52 IST

बघतोय काय मुजरा कर या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासुन चर्चा होत आहे. या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांना वंदन करुन अनोख्या ...

बघतोय काय मुजरा कर या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासुन चर्चा होत आहे. या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांना वंदन करुन अनोख्या रितीने मुजरा करण्यात आला आहे. एवढेच नाही तर गड किल्यांच्या संवर्धनासाठी देखील यातील कलाकार पुढाकार घेताना दिसत आहेत. हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असल्याने यासाठी हेमंत फारच उत्सुक आहे. हेमंत एक चांगला अभिनेता असल्याचे तर आपण पाहीलेच आहे. परंतू तो आता चांगला दिग्दर्शक होऊ शकतो का हे तर आपल्याला लवकरच समजणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे. सोशल साईट्सवर या चित्रपटाचे अनावरण करते वेळी हेमंत म्हणतो,मनगटातली ताकद अन हृदयातली आग,इतिहास नवा रचतील शिवबाचे वाघ! सादर करतो वणव्याची पहिली ठिणगी... अशा तडफदार शब्दांमध्ये हेमंतने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर पाहता आपल्याला चित्रपटामध्ये नक्कीच काहीतरी भन्नाट कथानक पाहायला मिळणार याचा अंदाज येतो. तर हेमंतने या चित्रपटाविषयी असलेल्या त्याच्या भावना सोशल साईट्सवर व्यक्त करताना सांगितले, शो-इंडस्ट्रीची  काही पार्श्वभूमी नसणाºया माज्यासारख्या एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मुलासाठी ही एक अभूतपूर्व संधी आहे.२०१७ माज्यासाठी फार महत्वाचे वर्ष. दिग्दर्शक म्हणून माझा पहिला सिनेमा फेब्रुवारीत प्रदर्शित होतोय. त्याचे टीझर, दोन महत्वाची गाणी आली आहेत. आज २०१७ सुरु होताना, आम्ही मुजराच्या ट्रेलरला लोकांसमोर आणण्याच्या तयारीत आहोत. माज्या करियरमधील हा एक मैलाचा दगड आहे. हेमंत सोबतच या चित्रपटाची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे हे मात्र खरे.