‘सैराट’चे रहस्य उलगडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 23:02 IST
नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘सैराट’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून अवकाश आहे. ...
‘सैराट’चे रहस्य उलगडलं
नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘सैराट’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून अवकाश आहे. मात्र त्यापुर्वीच या सिनेमातील गाणी, कलाकार यांना प्रेक्षकांनी डोक्यावर धरले आहे. या चित्रपटातील नवोदीत कलाकार आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधुन घेतले आहे. या कलाकारांची निवड कशी झाली, सिनेमाच्या शूटींगच्या वेळी काय काय घडले हे रहस्य उलगडले आहे. पाहूया काय आहे हे रहस्य.........* परशा अर्थात आकाश ठोसर हा सिनेमात काम करण्यापुर्वी पहेलवान होता. त्याने सिनेमासाठी ८ ते ९ किलो वजन कमी केले.* सैराटच्या हिरोईनला नागराजने बुलेट व ट्रॅक्टर चालवायला शिकविले.* रिंकुची सैराटसाठी निवड झाली तेव्हा ती सातवीत होती, आता ती नववीत आहे. मुळची ती अकलुजची आहे. * रिंकुला कॉलेज लाईफ माहित नव्हते, म्हणून तिला नागराजने कॉलेज लाईफबाबत माहिती दिली.* सिनेमा रिअल वाटावा म्हणून कोणताच सेट उभा न करता, गावातच शूटिंग केली.* परशा एक सिनमध्ये रेल्वे सोबत धावत असताना बोरीच्या झाडाला धडकतो आणि त्याच्या अंगात बोरीचे काटे घुसतात.* नागराजने या सिनेमात बरेच सिन त्याच्या जीवनावर आधारित आहेत. * परशाच्या भूमिकेसाठी आकाशची निवड एक रंजक किस्सा आहे. नागराजच्या भावाने आकाशला रेल्वे स्टेशनवर पाहिले आणि त्याचा फोटो नागराजला पाठविला. त्यानंतर त्यांनी भूमिकेसाठी आकाशला तयार केले. * सैराटची पूर्ण शूटिंग संपेपर्यंत आकाश नागराजच्या घरी थांबला होता.* सैराट हा अस्सल मराठी शब्द असून त्याचा अर्थ सुसाट, वेगवान असा होतो.