Join us

सायली संजीवमध्ये अभिनयासह दडली आहे ही कला, जाणून घ्या कोणती आहे ती कला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 13:25 IST

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव हिलाही आहे. सायली ही एक उत्तम चित्रकार असल्याचं समोर आले आहे

कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात. वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडतं. शुटिंगच्या रोजच्या बिझी शेड्युअलमध्ये स्वतःसाठी वेळ घालवत कलाकार त्या क्षणाचा आनंद घेत असतात. प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणाला जेवण बनवणं, कुणाला गायनाचा तर कुणाला फिरण्याचा छंद असतो. 

 

असाच काहीसा छंद मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव हिलाही आहे. सायली ही एक उत्तम चित्रकार असल्याचं समोर आले आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक वारली पेंटिंग काढत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. घराच्या भीतींवर तिनं काढलेले हे वारली पेटीग पाहून तुम्हालाही आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. 

छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहानी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. 

मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झालीय. गौरी म्हणून आजही रसिक ओळखत असून त्यांच्या विश्वासाला तसंच प्रेमाला तडा जाऊ देणार नाही असंही तिने सांगितले होते.मराठी मालिकांनंतर सायली मराठी चित्रपटांध्येही यशस्वी पदार्पण केलं.

 

फिटनेसबाबत सायली संजीव प्रचंड सजग आहे.आपल्या अभिनयाने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी सायली फिटनेसवर बरंच लक्ष देते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना फिटनेसबाबत टीप्सही ती देते. योगासनाद्वारे ती स्वतःला फिट ठेवते. विविध आसनं करत ती स्वतःला फिट ठेवते.असंच एक आसन करतानाचा सायलीचा फोटो चर्चेचा विषय ठरत असतात.तिच्या या फोटोंनाही बरेच लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत.  

टॅग्स :सायली संजीव