Join us  

'सर्व लाईन व्यस्त आहेत' प्रेक्षकांच्या पसंतीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 1:21 PM

मराठी चित्रपटसृष्टीत विनोदासाठी प्रसिध्द असलेले अभिनेते सिध्दार्थ जाधव एकदा पुन्हा प्रक्षकांच्या भेटीला सर्व लाईन व्यस्त आहेत या चित्रपटाच्या माध्यमातून येत आहे.

ठळक मुद्देस्त्री आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे

 मराठी चित्रपटसृष्टीत विनोदासाठी प्रसिध्द असलेले अभिनेते सिध्दार्थ जाधव एकदा पुन्हा प्रक्षकांच्या भेटीला सर्व लाईन व्यस्त आहेत या चित्रपटाच्या माध्यमातून येत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची निमिर्ती अमोल उतेकर यांनी केला असून कथा व दिग्दर्शन प्रदीप मेस्त्री यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने यातील कलाकारांनी लोकमतला भेट दिली. यावेळी सिध्दार्थ जाधव, सौरब गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, राणी अग्रवाल, हेमांगी कवी, निता शेट्टी उपस्थित होते.

या चित्रपटाची कथा बाब्या (सिध्दार्थ जाधव)व समीर(सौरब गोखले) यां दोघांभवती फिरते. दोघेपी चाळीत राहणारे असतात. समीर वयाच्या चोवीसनंतर आई वडिलांची कर्ज फेडण्यात जातात. आईच्या तब्येतीमुळे त्याचे लग्न जमत नसते. त्यामुळे त्याच्या घरातले त्याला ऐका बाबाकडे घेवून जातात ते बाबा जे सागतात ते सगळ खरं होत असते. या उलट बाब्या असतो. बाब्याच्या लग्नात त्याची गर्लफ्रेंड गोंधर घालते. त्या गोंधळातून समीर बाब्याला कसा सोडवतो, यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटातील विनोदामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे, असे सिध्दार्थ जाधव यांनी सांगितले. 

वेगवेगळ्या माध्यमांच्या आणि विषयांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे सिनेसृष्टीतील कलाकार हे सर्वांचे फेव्हरेट असतात. माझा आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून केवळ एकाचीच निवड करणे कठीण असते. कारण सर्वच कलाकार हे त्यांच्या अभिनय कौशल्यातून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतात. कधी-कधी ब-याच प्रेक्षकांची अशी ही इच्छा असू शकते की, ‘माझे आवडते कलाकार एकाच सिनेमात एकत्र दिसले तर तो सिनेमा किती इंटरेस्टिंग बनेल ना...!!’ सिनेसृष्टीत हळू-हळू अनेक बदल होत आहेत. जसे की सिनेमाचं चित्रीकरण, खास अभिनेत्रींवर आधारित सिनेमे ज्याला आपण वुमन ओरिएण्टेड फिल्म्स असे म्हणतो, एकाच सिनेमात अनेक स्टारकास्ट इ.

स्त्री आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे... सर्वच क्षेत्रात एक पाऊल पुढे आहे. त्याचप्रमाणे मनोरंजन क्षेत्रातही अभिनेत्री स्वत:च्या मेहनतीवर आणि अभिनय कौशल्याच्या बळावर स्वत:ची ओळख तयार करत आहे. दोन अभिनेत्रींचं फारसं पटत नाही अशी अफवा पण ब-याचदा सिनेसृष्टीत पसरली आहे पण मग तेव्हा काय होत असेल जेव्हा एकाच सिनेमात एकूण ५ अभिनेत्री प्रमुख भूमिका एकत्र साकारत असतात. एकाच सिनेमात पाच अभिनेत्री एकत्र म्हणजे सिनेमाची कथा ही अजून इंटरेस्टिंग बनणार यात शंका नाही. आपल्या मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांच्या फेव्हरेट पाच अभिनेत्री एकाच सिनेमात प्रमुख भूमिका साकारताना दिसतायेत.' 

टॅग्स :सिद्धार्थ जाधवहेमांगी कवी