Join us

सुलतानचा 'सैराट' क्लिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 12:38 IST

 सैराट मधील परशाची अर्थात अभिनेता आकाश ठोसर याची बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान यांची नुकतीच भेट झाली. या दोघांच्या भेटीचे ...

 सैराट मधील परशाची अर्थात अभिनेता आकाश ठोसर याची बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान यांची नुकतीच भेट झाली. या दोघांच्या भेटीचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भेटीमागचे कारण सुत्रांच्या म्हणण्यानुसार, सैराटचा फिव्हर असू शकते. नुकतेच मुंबई येथे या दबंग खानची व परश्याची भेट झाली आहे. यावेळी सलमानने आकाश व सैराट चित्रपटाचे विशेष कौतूक केल्याचे ही सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सुलतानच्या या सैराट क्लिकचे तरूणांनी सोशलमिडीयावर भरभरून कौतुक केले आहे. आकाश सध्या महेश मांजरेकर यांच्या एफयु या चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री माधुरी देसाई झळकणार आहे. तर आकाशच्या या दुसºया चित्रपटाची प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहत आहे. असो, पण तरूणांची धडकन बनलेला आकाश तर सर्वाचा लाडका दबंग खान यांना एकत्रित पाहून यांच्या चाहत्यांचा आनंद सैराटमय झाला असेल हे नक्की.