संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. आपल्या पदार्पण असलेल्या सिनेमात दिप्ती हॉट बिकिनी लूकमध्ये दिसणार आहे. तिचा हा लूक नुकताच आउट झाला आहे.
खरे तर, साइज झिरो लूक, बिकिनी बॉडी आणि सेक्सी हिरॉइन हे समीकरण बॉलीवूड सिनेमांमध्ये नवे नाही. मात्र मराठी फिल्म हिरोइनही अशा साइज झिरो, सेक्सी अंदाजात दिसणे हे नवीन आहे. थोडक्यात लकी सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीलाही आता साइज झिरो हिरोइन मिळाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. सूत्रांनूसार, फिल्ममेकर संजय जाधवच्या दिप्ती पहली हिरोइन असेल, जी बिकिनी लूकमध्ये दिसणार आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या हिरॉइन्स त्यांच्या सिनेमांमध्ये खूप सुंदर आणि सेक्सी दिसल्या आहेत. मात्र संजय जाधवांच्या सिनेमातल्या हिरोइनने बिकीनी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. लकीच्या अगोदर साउथ सिनेमामध्ये दिसलेल्या दिप्तीसाठीही बिकिनी घालण्याची ही पहिली वेळ आहे. ह्याअगोदर तिनेही कधीच बिकिनी घातली नव्हती.याविषयी विचारल्यावर दीप्ती म्हणाली, “मला जेव्हा सिनेमात बिकिनी घालायची आहे, असे समजले तेव्हा खरे तर मी थोडी नर्व्हस झाले होते. मात्र हा सिक्वेन्स चित्रपटाला कलाटणी देणारा ठरणार आहे, हे उमगल्यावर मी तयार झाले. संजयदादांनी सीन खूप एस्थेटेकली चित्रीत केलाय. मी कम्फर्टेबल असावे म्हणून दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि माझे हेअर-मेकअप आर्टिस्ट ह्यांच्याशिवाय त्यावेळी सेटवर कोणीही नव्हते.”