Join us

समिधाचा फन टाइम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 19:00 IST

कलाकारांच्या अपडेटसविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक हे नेहमीच उत्सुक असतात. त्याचप्रमाणे कलाकार हे आपल्या फावल्या वेळेत काय करत असेल. हा ...

कलाकारांच्या अपडेटसविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक हे नेहमीच उत्सुक असतात. त्याचप्रमाणे कलाकार हे आपल्या फावल्या वेळेत काय करत असेल. हा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडत असतो. प्रेक्षकांचे याच प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी लोकमत सीएनएक्सने अभिनेत्री समिधा गुरू हिच्या संवाद साधला आहे. समीधाने अवघाची संसार या मालिकेतून आपली ओळख निर्माण केली आहे. या मालिकेत समीधा खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. तसेच तिने कमला या मालिकेतून देखील तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.  सध्या समिधा दिग्गज दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेत सुबोध भावे, भूषण प्रधान, प्रि़या मराठी पाहायला मिळणार आहे. याआधी समिधाने कापूस कोंडयाची गोष्ट, कायदयाचं बोला, तुकाराम असे अनेक चित्रपटातदेखील काम केले आहे. अशी ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री समिधा सांगते, कलाकारांचे शेडयुल्ड हे पूर्णपणे बिझी असते. यातून थोडासा ब्रेक मिळाला तर कलाकार खूप धमाल करत असतात. सेटवर कोणाचा तरी फोटो काढायचा आणि त्याला फनी स्टिकर्स लावून मजा लुटायची. हे असे फनी स्टिकर्स देखील मला फार आवडतात. चित्रिकरणादरम्यान वेळ मिळाला तर मी मोबाइलवर नवनवीन अ‍ॅपस शोधत असते. तसेच असे फनी स्टिकर्सचा देखील शोध लावत असते. असाच एक फनी स्टिकर घेऊन मी एक झक्कास सेल्फी काढला आहे. हा सेल्फीसुद्धा मी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या सेल्फीला प्रेक्षकांनी भरभरून लाइक्स दिल्या आहेत.