Join us
Daily Top 2Weekly Top 5

साईचे मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 16:25 IST

           'पीके', 'डेव्हीड', 'आय मी और मै' आणि 'युवराज' यासारख्या बॉलिवूड चित्रपटात झळकलेला मराठमोळा ...

 
          'पीके', 'डेव्हीड', 'आय मी और मै' आणि 'युवराज' यासारख्या बॉलिवूड चित्रपटात झळकलेला मराठमोळा चेहरा म्हणजे साई गुंडेवार. साई लवकरच आपल्याला 'अ डॉट कॉम मॉम' या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. काही हिंदी चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शोज केल्यानंतर साई आता मराठी सिनेमाकडे वळला आहे.  हा त्याचा पहिलाच मराठी चित्रपट असल्याने तो या सिनेमासाठी फारच उत्सुक आहे. आई आणि मुलाचे भावनिक बंध उलगडणारा हा चित्रपट आहे. यामध्ये साईने कष्टाळू आणि आईवर खुप प्रेम असलेल्या मुलाची भूमिका सारालेली आहे. मुलाच्या आग्रहाखातर त्याची आई परदेशात जाते आणि तिथल्या संस्कृतीशी जुळवून घेताना घडणा-या गमती-जमती यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सीएनएक्सशी बोलताना साई म्हणतो, मराठी चित्रपटात काम करणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मी परदेशात जरी वाढलो असलो तरी कुटूंबातील संस्कारांमुळे आपल्या मराठी संस्कृतीला कधीच विसरलो नाही. परदेशात असताना मी माझ्या आई-वडिलांशी फोनवर मराठीतूनच बोलायचो. त्यामुळे मला भाषेची कधीच अडचण आली नाही. शिवाय माझी बायको देखील महाराष्ट्रीयनच आहे. त्यामूळे मराठी भाषा आणि संस्कृतीशी माझे नाते आजही घट्ट आहे. साईचा मराठमोळा अभिनय प्रेक्षकांना लवकरच 'अ डॉट कॉम मॉम' या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.