Join us  

आईमुळे रिंकूचे पाय आजही आहेत जमिनीवर; 'या' गोष्टीतून करुन देते सर्वसामान्य असल्याची जाणीव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 5:50 PM

Rinku rajguru:आईच्या 'या' गोष्टीमुळे रिंकूचे पाय आजही आहेत जमिनीवर

पहिल्याच सिनेमातून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावत आपल्या प्रेमात पाडणारा अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू (rinku rajguru). नागराज मंजुळे यांच्या  'सैराट' (sairat) या सिनेमातून रिंकूने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं आणि आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली. गेल्या काही काळापासून रिंकूचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. त्यामुळे या ना त्या कारणामुळे ती सातत्याने चर्चेत येत असते. प्रोफेशनल लाइफमुळे कायम चर्चेत येणारी रिंकू यावेळी तिच्या आईमुळे चर्चेत आली आहे.

अलिकडेच रिंकूने एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आईच्या स्वभावाविषयी भाष्य केलं. रिंकूची आई प्रचंड शिस्तीची आहे. त्यामुळे  रिंकू कितीही मोठी सुपरस्टार असली तरीदेखील तिला घरात आईच्या शिस्तीतच रहावं लागतं. घरातील एकंदरीत वातावरण कसं असतं हे रिंकून या मुलाखतीत सांगितलं.

रिंकूने मराठीसह बॉलिवूड आणि टॉलिवूड या दोन्ही इंडस्ट्रीत काम केलं आहे. त्यामुळे तिची क्रेझ आज तुफान आहे. परंतु, असं असतानाही तिचे पाय मात्र जमिनीवर आहेत. रिंकूची आई वाजवीपेक्षा जास्त मुलांचे हट्ट पुरवत नाही. तसंच, घरात जेवणाच्या बाबतीतही त्यांचे काही नियम आहेत. 

 "लहान असताना मी भाज्या खात नव्हते. पण, या बाबतीत आईने माझे कधीच लाड पुरवले नाहीत. मला एखादी भाजी आवडत नाही म्हणून तिने कधीच दुसरी भाजी करुन दिली नाही. बाकीच्यांसारखे आमचे लाड केले नाहीत. खायचं तर खा नाही तर उपाशी रहा", असं रिंकू म्हणाली.

पुढे ती म्हणते, "आई खूप शिस्तीची होती त्यामुळे लहानपणापासून सगळं खायची सवय लागली. अगदी मेथी, पालक सगळे पदार्थ आईने खाऊ घातले. आता जरी मी स्टार असले तरीसुद्धा आई माझे कोणते नखरे सहन करत नाही. आमच्या घरी रोज वेगवेगळ्या भाज्या असतात. पण, एखाद्या दिवशी ही भाजी नको असं म्हटलं तर मग, मी एवढं करुन ठेवलंय. आता ते खा नाही तर उपाशी मरा असं सांगते. जेव्हा खरच लाड करायचे असतात तेव्हा ती खूप लाड करते. पण, अवाजवी नखऱे सहन करत नाही."

टॅग्स :रिंकू राजगुरूसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूडTollywood