Join us  

वडिलांच्या कडेवर बसलेल्या 'या' चिमुकलीने लावलं महाराष्ट्राला 'याड'; तुम्ही ओळखलं का तिला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 7:16 PM

Marathi actress: अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

सध्याचा काळ हा समाजमाध्यमांचा आहे त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करत असल्याचं पाहायला मिळतं. यात अनेकदा कलाकार मंडळी त्यांच्या जीवनातील लहानसहान अपडेटही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तर, काही वेळा त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी  बालपणीचे वा कॉलेज जीवनातील फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यात सध्या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही अभिनेत्री वडिलांच्या कडेवर बसल्याचं दिसून येत आहे.

नागराज मंजुळे यांच्या सैराट (sairat) चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू ( rinku rajguru).  पहिल्याच चित्रपटातून रिंकूने उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. म्हणूनच, रिंकू दररोज या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. 

रिंकू सोशल मीडियावर बऱ्याचदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. यात अनेकदा ती तिच्या अपकमिंग प्रोजेक्ट, जीवनातील लहानसहान किस्से शेअर करत असते. यावेळी तिने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या वडिलांच्या कडेवर बसली आहे. हा फोटो सध्या व्हायरल होत असून त्यावर अनेक जण कमेंट करत आहेत.

दरम्यान, 'सैराट' चित्रपटातून मराठी सिनेविश्वात पदार्पण करणाऱ्या रिंकूने 'कागर', 'मेकअप', 'झुंड' या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. तसंच काही वेब सीरिजमध्येही ती झळकली आहे. 

टॅग्स :रिंकू राजगुरूसेलिब्रिटीसिनेमा