Join us  

रिंकू राजगुरुचा नो मेकअप लूक; तुम्ही पाहिलंय का कधी रिंकूला विदाऊट मेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 4:40 PM

Rinku rajguru: रिंकूचा विदाऊट मेकअप लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.

सध्याच्या काळात प्रत्येक सेलिब्रिटी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत आहे. त्यामुळे या माध्यमातून ते कायम त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल अशा दोन्ही लाइफविषयीचे अपडेट शेअर करत असतात. यामध्येच सध्या नेटकऱ्यांमध्ये  लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू (rinku rajguru) हिची चर्चा रंगली आहे. रिंकूने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिने कोणताही मेकअप केलेला नाही. 

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रिंकूचा 'झिम्मा 2' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. त्यामुळे या सिनेमामुळे ती सातत्याने चर्चेत येत आहे. मात्र, त्या सिनेमासोबतच ती तिच्या खासगी आयुष्यातील अपडेट्स सुद्धा चाहत्यांना देत आहे. सिनेमाच्या धावपळीतून ब्रेक घेत रिंकू तिचा निवांत क्षण एन्जॉय करत आहे. इतकंच नाही तर तिने यावेळी तिचा नो मेकअप लूक असलेला फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती निसर्गाच्या सानिध्यात असल्याचं दिसून येत आहे. सोबतच तिने साधे कम्फर्टेबल असे कपडे परिधान केले आहे. विशेष म्हणजे रिंकूने चेहऱ्यावर कोणताही मेकअप केलेला नसूनही ती कमालीची सुंदर दिसत आहे. त्यामुळे तिच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :रिंकू राजगुरूसेलिब्रिटीसिनेमा