Join us
Daily Top 2Weekly Top 5

ग्लॅमरस सई ताम्हणकरचे साडीतलं खुललं सौंदर्य, फोटोशूट पाहताच चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 17:44 IST

एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी सई पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.  तिची प्रत्येक अदा रसिकांना घायाळ करणारी अशी वाटते. सौंदर्य, अदा आणि उत्तम अभिनयाचा अनोखा मेळ सईमध्ये दिसत असल्याने रसिक तिचं तोंडभरुन कौतुक करतात. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते. शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते.

 नेहमीच सईचा तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. यावेळी मात्र सईने तिचे साडीतले फोटोशूट इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये पिवळ्या रंगाच्या साडीत सई वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. फोटोतील सईच्या अदा तिच्या चाहत्यांना आवडल्या आहे. एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी सई पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे. 

दमदार भूमिका साकारणारी सई तितकीच स्टायलिश आहे. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. लवकरच ती लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात क्रिती सनॉन, पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

टॅग्स :सई ताम्हणकर