Join us
Daily Top 2Weekly Top 5

सई रमली मायरामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 13:14 IST

बॉलिवुड असो या मराठी इंडस्ट्री येथे घडणारी प्रत्येक  गोष्ट ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. भले ते कामाविषयी असो या वैयिक्तक ...

बॉलिवुड असो या मराठी इंडस्ट्री येथे घडणारी प्रत्येक  गोष्ट ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. भले ते कामाविषयी असो या वैयिक्तक जीवनाबद्दल आपल्या आवडत्या कलाकारांच्या जीवनात घडणाºया लहान लहान गोष्टी जाणून घेण्यासाठी त्या त्या कलाकाराचे चाहते अधीर झालेले असतात. आता, हेच बघा ना, मराठी इंडस्ट्रीचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी याला नुकतीच कन्यारत्न प्राप्त झाली आहे. स्वप्नीलने आपल्या कन्येचे मायरा हे सुंदर नाव ठेवले आहे. पण या गोंडस मायराला भेटण्यासाठी मराठी इंडस्ट्रीतील कलाकार पोहोचले की नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात फिरत होता. पण फायनली चाहत्यांची ही इच्छा  अभिनेत्री सई ताम्हणकरने पूर्ण केली आहे. या चिमुकलीला भेटण्यासाठी अभिनेत्री सई ताम्हणकर थेट औरंगाबादला पोहोचली आहे. यावेळी तिने मायरासोबतचे काही आनंदी क्षण सोशलमिडीयावर शेअर केले आहे. तिने मायरा आणि स्वप्नीलसोबतचा एक झक्कास फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये सई ताम्हणकर बेबी मायरामध्ये एकदम रमलेली दिसत आहे.