सचिन खेडेकर सांगतात, चित्रपट महोत्सवाची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 11:34 IST
चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून नवोदित कलाकार घडत असतात. कारण अशा या महोत्सवाच्या माध्यमातून अभिनय, दिग्दर्शन व चित्रपट हे कलाकारांना मार्गदर्शन ...
सचिन खेडेकर सांगतात, चित्रपट महोत्सवाची गरज
चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून नवोदित कलाकार घडत असतात. कारण अशा या महोत्सवाच्या माध्यमातून अभिनय, दिग्दर्शन व चित्रपट हे कलाकारांना मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर उत्तमोत्तम चित्रपट पाहिल्यानंतर एक प्रगल्भ प्रेक्षकही तयार होऊ शकतो. अशी भावना प्रेक्षकांचे लाडके कलाकार सचिन खेडेकर यांनी व्यक्त केली. चौथ्या औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा महोत्सव प्रोझोन मॉलमधील आयनॉक्स चित्रपटगृहात नाथ ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, ज्येष्ठ दिग्दर्शक व चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, संयोजक नंदकिशोर कागलीवाल, प्रोझोन मॉलचे मोहम्मद अर्शद, ज्येष्ठ लेखक डॉ. अजित दळवी, उल्हास गवळी आदि उपस्थित होते. तसेच आपण शास्त्रोक्त अभिनयाचे शिक्षण घेतलेले नसून चित्रपट महोत्सव, अभिनयाचा सराव आणि लेखकांच्या संस्कारामुळे घडल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर चित्रपट महोत्सव हे प्रेक्षकांना कलात्मकतेतील वेगळेपण देणारा उपक्रम आहे. आज चित्रपट माध्यमातील अनेक नवनवीन प्रयोगांची माहिती, ज्ञान प्रेक्षकांना मिळण्याची गरज आहे. चित्रपट माध्यमातील रसग्रहण करणाºया प्रेक्षकांची सध्या गरज आहे. अलीकडे भरणाºया चित्रपट महोत्सवांमुळे मराठी प्रेक्षकांची अभिरुची विशिष्ट उंचीवर पोहोचली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सचिन खेडेकर यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत. तसेच त्यांनी अनेक बॉलिवुड चित्रपटांच्या माध्ममातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. त्यांचा मी शिवाजीराव भोसले बोलतोय या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. त्याचबरोबर छोटया पडदयाच्या माध्यमातूनदेखील ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात.