Join us

भूषण प्रधान आणि प्राजक्ता माळी या जोडीवर चित्रिकरण करण्यात आलेले रोमँण्टिक साँग व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 16:07 IST

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनोख्या जोडया कोणत्या ना कोणत्या मार्गाने पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, अभिनेता भूषण प्रधान ...

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनोख्या जोडया कोणत्या ना कोणत्या मार्गाने पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, अभिनेता भूषण प्रधान आणि प्राजक्ता माळी अशी ही अनोखी जोडी प्रेक्षकांना एका रोमँण्टिक साँगच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या जोडीवर चित्रिकरण करण्यात आलेले हे साँग सोशलमीडियावर व्हायरल झाले आहे. या गाण्याला सोशलमीडियावर मोठया प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. या जोडीचे हे रोमँटिक गाणे प्रेमी युगुलांना त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारे आहे. रिचमंड एंटरटेंटमेंट प्रस्तुत 'फिलिंग्स' या म्युझिकल अल्बममधले हे गाणे आहे. या गाण्याला स्वप्नील बांदोडकर यांनी स्वर साज चढविले आहे. तर  या गाण्यांचे किरण खोत यांनी दिग्दर्शन केले आहे.  या गाण्याच्या निमित्ताने भूषण प्रधान आणि प्राजक्ता माळी हे दोन कलाकार पहिल्यांदाच एकत्रित आले आहेत. भूषण प्रधान याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. जुळून येथील रेशीमगाठी या मालिकेच्या माध्यमातून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिची रेश्माची भूमिका आज ही प्रेक्षक विसरले नाहीत. त्याचबरोबर सध्या ती नकटीच्या लग्नाला यायचं हं... या मालिकेत पाहायला मिळत आहे. तसेच तिचा आगामी चित्रपटदेखील प्रदर्शनास सज्ज झाला आहे. प्रवीण कुंटे दिग्दर्शित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात ती सोनाली कुलकर्णी, ललित प्रभाकर, प्रियदर्शन जाधव या कलाकारांसोबत झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा प्राजक्ता आणि ललितची जोडी पाहायला मिळणार आहे.