Join us
Daily Top 2Weekly Top 5

इमेजपेक्षा भुमिका महत्वाची वाटते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 17:41 IST

  मनाच्या कोपºयात कायमच बंदिस्त करुन ठेवाव्यात अशा अप्रतिम कवीतांचा खजाणा या कवीच्या पोटलीतच आहे.  आपल्या कवितांनी आज घराघरात ...

  मनाच्या कोपºयात कायमच बंदिस्त करुन ठेवाव्यात अशा अप्रतिम कवीतांचा खजाणा या कवीच्या पोटलीतच आहे.  आपल्या कवितांनी आज घराघरात पोहचलेले नाव म्हणजे संदिप खरे. दमलेल्या बाबची कहाणी या गाण्याने आज सर्वत्र ओळखले जाणारे संदिप खरे आता दमलेल्या बाबाची कहाणी या सिनेमामध्ये बाबांच्या भुमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील त्यांच्या भुमिकेविषयी संदिप खरे यांनी सीएनएक्सशी साधलेला हा मनमोकळा संवाद....      दमलेल्या बाबाची कहाणी हा सिनेमा स्वीकारण्यामागील तुमची भुमिका काय ?-:  मी जेव्हा या सिनेमाची कथा ऐकली तेव्हाच मला तो चित्रपट आवडला. त्यातील बाबची भुमिका मला भावल्याने मी तो करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटातील बाबा हा तरुण वयापासुन ते वृद्धापर्यंत असा दाखविण्यात आला आहे. एक अभिनेता म्हणुन आव्हानात्मक भुमिका करण्याची ही संधी मिळाल्याने मी हा चित्रपट स्वीकारला.                                या चित्रपटात बाबाची भुमिका करण्यासाठी काही तयारी केली होती का ?-:  मी नाटकात पुर्वी काम केले असल्याने माझ्यासाठी हे क्षेत्र काही फार नवीन नव्हते किंवा मी अगदीच वेगळ््या ठिकाणी आलोय असेही नव्हते. आपण नेहमीच्या आयुष्यात जगत असताना आपल्या सभोवती अनेक वेगळ््या प्रकारची माणसे असतात त्यांच्या नकळत निरिक्षणातूनच तुम्ही खुप काही शिकता . त्यामुळे मला वेगळी अशा तयारी करावी लागली नाही. सभोवतालच्या व्यक्तींच्या निरिक्षणातून मला तो बाबा सापडला.    तुम्हाला देखील मुलगी आहे, मग व्यक्तीगत आयुष्यातील बाबा अन या चित्रपटातील बाबा यामध्ये किती साम्य आहे ?-: हा चित्रपट पाहताना प्रत्येक बाबालाच यामध्ये आपली प्रतिमा दिसु शकते. असा तो सर्वांच्या जवळ जाणारा, प्रत्येकाला रिलेट करणारा बाबा आहे. तो जसा मुलीच्या काळजीने घुसमटलेला, दमलेला आहे तसाच एका पॉईंटला अ‍ॅग्रेसीव्ह देखील आहे. त्यामुळे मी माझ्या व्यक्तीगत आयुष्यात असा जरी नसलो तरी यातील काही सीन्स करताना मला नकळतपणे मी दिसायचो.  सध्या रोमँटिक हिरोंची क्रेझ असताना, तुम्ही बाबांच्या भुमिकेत दिसणार आहात, याबद्दल काय सांगाल ?-: मी खरच सांगु का, मला बागेमध्ये गाणी म्हणत हिंडणाºया हिरोंचे रोल्स करायचे नाहीत. मी माझ्या मित्रा या पहिल्या सिनेमाता कॉलेज तरुणाची भुमिका केली होती पण तो रोल देखील वेगळा होता. या चित्रपटात जो बाब दाखविण्यात आला आहे तो खुपच सशक्त अन एक अभिनेता म्हणुन वेगळ््या उंचीवर जाणारा आहे. मला इमेजपेक्षा माझी भुमिका महत्वाची वाटते. भूमिकेनूसार अभिनेत्याने स्वत:ला बदलले पाहिजे. त्यामुळे कोणत्या इमेज मध्ये अडकुन न राहता चांगल्या दर्जाच्या भुमिका करायला मी प्राधान्य देईन.                     एखाद्या  गाण्यावरुन काढलेला हा पहिलाच चित्रपट आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटते ?-: दमलेल्या बाबाची कहाणी या गाण्याला लोकांनी खुपच पसंती दर्शविली. पालकांनी तर या गाण्याला डोक्यावर घेतले होते. आता या गाण्यावर चित्रपट काढायचा ही कल्पनाच खुप चांगली होती.  हे गाणे ऐकताना प्रत्येकानेच याचे व्हीज्युअलायझेशन करुन घेतले होते. आता हे गाणे चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहे. या चित्रपटात बाप-लेकीची कहाणी तर आहेच परंतू या पलीकडे जाऊन समाजात स्त्रीयांवर होणाºया अत्याचारावर देखील प्रकाश टाकण्यात आला आहे. सामाजिक आशयावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.     यापुढे चित्रपटाच्या काही आॅफर्स आल्या तर काम करायला आवडेल का ?-:  हो नक्कीच मला सिनेमांमध्ये काम करायला आवडेल. सिनेमा हे तुम्हाला व्यक्त होण्यासाठी एक सशक्त अन प्रभावी माध्याम आहे. चांगले विषय आले तर मी काम करण्याचा विचार करेलच.