Join us

सौरभ साकारणार संत ज्ञानेश्वरांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 12:12 IST

'संत ज्ञानेश्वर' यांच्याविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे. पण आपल्या आई-बाबांना, आजी-आजोबांना नक्कीच जास्त माहिती असेल. आजच्या किंवा उद्याच्या पीढीला ...

'संत ज्ञानेश्वर' यांच्याविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे. पण आपल्या आई-बाबांना, आजी-आजोबांना नक्कीच जास्त माहिती असेल. आजच्या किंवा उद्याच्या पीढीला संत ज्ञानेश्वरांविषयी माहिती कळावी, त्यांचे महत्त्व आणि त्यांनी केलेले कार्य कळावे म्हणून एक नवीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

संत ज्ञानेश्वरांवरांवर आधारित एकूण १० एपिसोड असलेला ‘संत ज्ञानेश्वर’ हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. अभिनेता सौरभ गोखले संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारणार असून २७ जून रोजी या कार्यक्रमाचे ग्रँड ओपनिंग होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण सोमवार आणि मंगवार रोजी रात्री ९:३० वाजता  कलर्स मराठी वाहिनीवर होणार आहे.