Join us

वैभव साकारणार भोपाली बाबूची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 12:08 IST

          अभिनेता वैभव तत्ववादी मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे घराघरात पोहोचला होता. त्यानंतर वैभव संजय ...

 
 
        अभिनेता वैभव तत्ववादी मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे घराघरात पोहोचला होता. त्यानंतर वैभव संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात एका महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला. हा चित्रपट वैभवच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरला होता. वैभव आता पुन्हा प्रकाश झा यांच्या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये येतो आहे. 'लिपस्टिक' या प्रकाश झा यांच्या चित्रपटात वैभवची वर्णी लागली आहे. या चित्रपटात कोंकणा सेन, श्रृती महाजन, रत्ना पाठक या कलाकारांचादेखील समावेश आहे. प्रकाश झा यांचे चित्रपट नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे असतात. आता लिपस्टीक या सिनेमामध्ये त्यांनी नक्की कोणता विषय मांडला आहे हे अजून तरी समजले नाही. परंतु नावावरुनच या चित्रपटाची कथा इंटरेस्टींग असणार असे वाटतेय. या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो नुकताच वैभवने सोशल साईट्सवर अपलोड केला आहे. वैभवची बॉलिवूडमध्ये  गाडी सुसाट सुटलीय असे म्हणायला खरेतर काहीच हरकत नाही. त्याला बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांच्या ऑफर्स देखील आहेत. आता या चित्रपटानंतर वैभव कोणत्या हिंदी चित्रपटात झळकणार याची देखील उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागलेली आहे.