Join us

'अग्निपथ'मध्ये अमिताभच्या आईच्या भूमिकेत झळकलेल्या रोहिणी हट्टंगडी, म्हणाल्या - "मी जेव्हा मेरा बेटा गुंडा नही था म्हणायचे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:57 IST

Rohini Hattangadi : अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी अग्निपथमध्ये अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. अलिकडेच एका मुलाखतीत त्यांनी या भूमिकेबद्दल सांगितले.

रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी हिंदीतही बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत आणि त्यांच्या या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत. त्यांनी अग्निपथमध्ये अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. अलिकडेच एका मुलाखतीत त्यांनी या भूमिकेबद्दल सांगितले.

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतेच आरपार ऑनलाइनला मुलाखत दिली. त्यात सांगितले की, मेरा बेटा गुंडा नहीं था.. हे जेव्हा शेवटी मी 'अग्निपथ'मध्ये म्हणते. ते विश्वसनीय होतं. मी जाऊन उभी राहिले. हे करुन माझ्याकडे मुकुलने असं पाहिलं. मी असे छान अंबाडा वगैरे घालून गेले होते. पाहिलं... माझ्या केसांमध्ये असा असा हात फिरवला. म्हणजे विस्कटले माझे केस. हां अब ठीक है. त्यामुळे त्याच्यानंतर हे लावल्यानंतर मी विंचरायची वगैरे नाही उलट दोन बटा मी जास्तच काढायची आणि सबंध अशी विस्कटून हे करायची. म्हणजे त्यामुळे त्या कॅरेक्टरला त्या खादीच्या साडीमुळे त्या चष्म्यामुळे त्याला एक कॅरेक्टर आले होते. तुमचा गेटअपसुद्धा तुम्हाला खूप सपोर्ट करतो. त्यामुळे मेरा बेटा गुंडा नही था हे जेव्हा शेवटी म्हणते ते विश्वसनीय होतं की ही बाई तिला हे करायला नकोय ह्यांनी. कारण ती या बॅकग्राउंडने आलेली आहे. ते सबंध एकत्र तो आपण एकजिनसी म्हणतो ना मग तसं ते होतं त्यामुळे मग ज्यावेळेस मी त्याला म्हणते अपने हाथ धोले ते विश्वसनीय वाटतं की हे हीच बाई बोलू शकते. बाकी नाही कोणी बोलू शकत. 

वर्कफ्रंट

रोहिणी हट्टंगडी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात मराठी रंगभूमीवरुन केली. त्यांनी मुंबईत 'आविष्कार' या मराठी थिएटर ग्रुपची सुरुवात केली. या संस्थेने १५० हून नाटकांची निर्मिती केली आहे. या ग्रुपच्या बऱ्याच नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला. १९७८ साली 'अजीब दास्तां' या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यांच्या या सिनेमाला फिल्मफेअरचा क्रिटिक्स अवॉर्ड मिळाला होता. 'अर्थ', 'सारांश', 'गांधी', 'चक्र', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'मोहन जोशी हाजिर हो', 'चालबाज', 'अग्निपथ', 'दामिनी', 'मुन्ना भाई एमबीबीएस' या चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. 'चार दिवस सासूचे', होणार सून मी ह्या घरची अशा बऱ्याच मालिका त्यांच्या लोकप्रिय ठरल्या. 

टॅग्स :अमिताभ बच्चन