Join us

जेनिलियासोबत मराठी चित्रपट बनवण्याचे रितेश देशमुखचे स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 15:51 IST

पदार्पणाच्या चित्रपटात जेनेलियासोबत जोडी जमवलेल्या रितेश देशमुखच्या जीवनात ही जोडी कायमची जमली. त्यांचा सुखाचा संसार सुरू असून दोन गोंडस ...

रितेश आणि जेनेलिया पुन्हा एकत्र कधी काम करणारा असा प्रश्न रितेशला विचारला होता." आजपर्यंतची ती माझी सर्वात फेवरेट को स्टार राहिली आहे. तिच्यासोबत काम करताना खूप आनंद होतो," असे रितेश म्हणाला." मला तिच्यासोबत मराठी चित्रपट करायचा आहे, कारण यापूर्वी तिने अनेक भाषेमध्ये चित्रपट केले आहेत. त्यामुळे जेनेलियासोबत मराठी चित्रपट बनवण्याचे माझे स्वप्न आहे," असेही रितेशने सांगितले.निर्माता म्हणून मराठी चित्रपट सृष्टीत घडत असलेल्या घटनांचा रितेशला आनंद वाटतो." मराठी चित्रपट सृष्टीत होणाऱ्या बदलांचा मला अभिमान वाटतो. ते आशयघन आहेत आणि मी तिन चित्रपटांवर काम करीत आहे. त्यातील एका चित्रपटचा मी निर्माता आहे. मी त्यासाठी खूप उत्सुक झालो आहे," असे तो म्हणाला.रितेश आणि जेनेलिया यांचा विवाह २०१२ मध्ये झाला. त्यांना पहिला मुलगा रियान नोव्हेंबर २०१४ मध्ये झाला तर दुसऱा मुलगा १ जून २०१६ मध्ये झाला आहे. दोन्ही मुलांच्यात असलेल्या बंधू प्रेमावर रितेश खूश आहे.