Join us  

Best Makeup साठी प्रत्येक मुलीला रिंकू राजगुरू देतेय हा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 7:15 AM

आर्ची उर्फ रिंकू राजगुरू लवकरच 'मेकअप' चित्रपटात झळकणार आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. 

नुकताच रिंकूने इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा काळ्या रंगाच्या कुर्तीमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे. हा फोटो शेअर करून तिने म्हटलं की, प्रत्येक मुली स्माईलच्या माध्यमातून बेस्ट मेकअप करू शकतात.

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'सैराट'मध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. 'सैराट'मध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग,तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच 'सैराट'मधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली.

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

'सैराट'च्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर ती कागर सिनेमात झळकली. आता ती लवकरच 'मेकअप' चित्रपटात पहायला मिळणार आहे.

सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत.

या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्याव्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूसैराट 2मेकअपकागर